Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींवर महिलाराज

राहुरी ः नुकताच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राहुरी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींवर निर्वाचित नूतन महिला सरपंच निवडून आल्याने ’बाई पण भा

सेवाभावी पुरस्कार आणि ग्रंथप्रकाशनच खरे पुण्यस्मरण ः काका कोयटे
राहाता तालुक्यात एकलव्य जयंती उत्साहात
भिंगारच्या ’त्या’ घटनेबद्दल नोंदवले 40 जबाब ; येत्या दोन-तीन दिवसात अहवाल अपेक्षित, पोलिस व नागरिकांचे लक्ष

राहुरी ः नुकताच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राहुरी तालुक्यातील 19 ग्रामपंचायतींवर निर्वाचित नूतन महिला सरपंच निवडून आल्याने ’बाई पण भारी देवा’ या प्रमाणे महिला वर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. राहुरी तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीची सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली. यामध्ये तब्बल 19 ग्रामपंचायतींवर सरपंच पदावर महिलाराज आले आहे.
या 19 ग्रामपंचायतींवर लोकनियुक्त झालेल्या महिला सरपंच या विविध राजकीय स्थानिक आघाड्यांच्या गटांकडून उभ्या राहिल्या होत्या. राहुरी तालुक्यातील सुवर्णा सुरेश बानकर (ब्राम्हणी), योगिता नितीन कल्हापुरे (देसवंडी), सविता सर्जेराव पानसंबळ (सडे), कुसूम रामचंद्र खरात (मुसळवाडी), उमाताई एकनाथ नान्नोर (गंगापूर), मनिषा आप्पासाहेब तमनर (तमनर आखाडा), सुजाता अरुण पवार (म्हैसगाव), शोभाताई रावसाहेब लाटे (चिंचोली), रेणुका कुंडलिक गावडे (डिग्रस), विमलबाई रावसाहेब शिंदे ( मोमीन आखाडा), गंगूबाई जालींदर पवार (मालूंजे खुर्द), बेबी रामदास बर्डे (शिलेगाव), लिलाबाई चंद्रकांत गायकवाड (टाकळीमिया), सविता रामचंद्र शेटे (पिंप्री वळण), सुवर्णा मच्छिंद्र सोनवणे (धामोरी खुर्द) , स्वाती संदिप कवडे (माहेगाव), पुष्पा भारत रोकडे (दरडगाव थडी), अलका रामदास माने (धामोरी बु), निशा मधुकर गागरे (कानडगाव) या गावांमध्ये महिला राज आले असल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहेत.

COMMENTS