Homeताज्या बातम्या

रांजणगाव शिवारात आढळला ३५ वर्षीय तरुणाचा बेवारस मृतदेह; सुपा पोलिसांचे नागरिकांना ओळखीचे आवाहन

पारनेर: तालुक्यातील रांजणगाव मशिद - अस्तगाव रोडवरील रांजणगाव शिवारात अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी युवक संशयास्पदरित्या बेशुद्धावस्थेत आढळून आला. स्थान

जल जीवन मिशन कर्मचार्‍यांना नियमित वेतन देण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
विविध फसव्या वित्तीय संस्थांविरुद्ध कायदेशीर कारवाईला गती द्यावी; ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
जेष्ठ क्रीडा शिक्षक शिवकुमार निर्मळे यांना ‘अजितदादा पवार सन्मान पुरस्कार’; घाटनांदुर येथे गुणवंतांचा गौरव
एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या, भावांनी मिळून मुलीच्या बापालाच संपवलं;  अहमदनगर हादरले| man killed by three youth in ahmednagar detained by supa  police| Saam Tv News

पारनेर: तालुक्यातील रांजणगाव मशिद – अस्तगाव रोडवरील रांजणगाव शिवारात अंदाजे ३५ वर्षीय अनोळखी युवक संशयास्पदरित्या बेशुद्धावस्थेत आढळून आला. स्थानिकांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय, पारनेर येथे उपचारासाठी दाखल केले असता, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

मृत युवकाने अंगात नेव्ही ब्लू (गडद निळा) रंगाचा शर्ट आणि निळसर जीन्स पॅन्ट परिधान केलेली आहे. या वर्णनाची किंवा या व्यक्तीबाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी तातडीने सुपा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सुपा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

या घटनेबाबत सुपा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार रवी निमसे करत आहेत.

COMMENTS