कोपरगाव: संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळालेला स्वायत्त दर्जा आणि विद्यार्थ्यांना दिले जाणारे सॅप (SAP) प्रणालीचे उत्कृष्ट प्रशिक्षण यामुळ
कोपरगाव: संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळालेला स्वायत्त दर्जा आणि विद्यार्थ्यांना दिले जाणारे सॅप (SAP) प्रणालीचे उत्कृष्ट प्रशिक्षण यामुळे महाविद्यालयातील १३ विद्यार्थ्यांना एकाच वेळी ‘एलटीआय माइंडट्री’ (LTI Mindtree) या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधी मिळाली आहे. कंपनीने निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक पाच लाख रुपयांचे आकर्षक पॅकेज दिले आहे. या यशामुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
या निवडीमुळे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून नोकरी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या आता ९३० वर पोहोचली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे संचालक डॉ. आर. ए. कापगते म्हणाले, ‘‘संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त असल्याने उद्योग क्षेत्राच्या आधुनिक गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘सॅप’ या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीसोबत महाविद्यालयाने सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना सॅप प्रमाणित प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणाचा मोठा फायदा विद्यार्थ्यांना एलटीआय माइंडट्री या कंपनीत नोकरी मिळविताना झाला आहे.’’
निवड झालेले १३ भावी अभियंते:
- संगणक अभियांत्रिकी विभाग: हर्षल नंदलाल बच्छाव, निलम संतोष परंदे, आकांक्षा अप्पासाहेब बेल्हेकर, कल्याणी दिलीप कर्डे, सार्थक प्रदीप तनपुरे, तृप्ती नवनाथ ठोंबरे, अखिलेश उन्निक्रिष्नन आयनिक्कदन, समृद्धी प्रदीप सोनवणे.
- माहिती तंत्रज्ञान (IT) विभाग: प्रणव किशोर गागरे.
- इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग: सुमित जयवंत कोटमे, ईश्वरी योगेश माने, यशराज माधव शिंदे आणि धनश्री प्रदीप शिरोळे.
विद्यार्थ्यांच्या या दैदीप्यमान यशाबद्दल संजीवनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त अमित कोल्हे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सॅप विभागाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. ए. बी. पवार यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.

COMMENTS