नवगण राजुरी : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ज

नवगण राजुरी : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नवगण राजुरी येथील गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शेकडा निकाल 97.93% इतका लागला असून यावर्षी पण या कनिष्ठ महाविद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातून इ.12 वीच्या परीक्षेला विज्ञान शाखेचे 487 पैकी 485 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शेकडा निकाल 99.58% टक्के आणि वाणिज्य शाखेचे 38 पैकी 37 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शेकडा निकाल 97.36% तर कला शाखेचे 100 पैकी 92 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शेकडा निकाल 92.00% एवढा लागला असून गुणानुक्रमे विज्ञान शाखेतून प्रथम कु. पोकळे अमृता रामदास 91.17%, द्वितीय कु. जोगदंड वृषाली विष्णु 91.00%, तृतीय कु. जायभाये अक्षरा शेषेराव 90.67%, कु. कोकाटे श्रावणी नितीन 90.67%, कला शाखेतून प्रथम कु. चव्हाण आम्रपाली जालिंदर 85.83%, द्वितीय कु. राहिंज प्रतिभा सदाशिव 83.83%, तृतीय कु. लकडे रूपाली बाबुराव 78.33%, आणि वाणिज्य शाखेतून प्रथम चि. ठोसर अजय बाळू 83.83%, द्वितीय कु. कटकाळे वैष्णवी रामा 75.00%, तृतीय चि. काळे आदर्श दत्तात्रय 72.33% घेवून उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, युवा नेते रोहित क्षीरसागर, संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ. राजा मचाले, सहाय्यक प्रशासन अधिकारी योगेश पवार, कार्यवाहक एम. ए. राऊत, गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पवळ, उपमुख्याध्यापक शिंदे एस. एस., पर्यवेक्षक दगडे व्ही. एन., शेख एस. वाय., सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

COMMENTS