Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोकणवाडी येथे बाल भैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात

अकोले : तालुक्यातील विश्रामगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोकणवाडी येथे हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर बाल भैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात पार पडला. चैत्र पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मानाची काठी व मानाचा ढोल खेड भैरवनाथाच्या दर्शनानंतर कोकणवाडीत आणण्यात आला. दुपारी ढोल-ताशे व डी.जे.च्या तालावर गावकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.  दरम्यान, अवकाळी पावसामुळे मिरवणुकीत काहीसा व्यत्यय आला. मात्र पावसाची पर्वा न करता तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थांनी मिरवणूक अखंड सुरू ठेवत भक्तीभावाने काठी भैरवनाथाच्या दर्शनासाठी नेली. यात्रोत्सवानिमित्त रात्री अंबेवगण लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सरपंच सुलोचना संतू जाधव, उपसरपंच जगन किसन लोहरे व मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी कामगार कमिटीचे भाऊ बेंडकोळी, एकनाथ गोडे, तुकाराम बेंडकोळी, विठ्ठल जाधव, बहिरू जाधव, ज्ञानेश्वर जाधव, भागवत जाधव, भगवान जाधव तसेच महादर्पणचे प्रतिनिधी संतू जाधव, दत्तू  जाधव, प्रकाश जाधव, विकास जाधव यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिकांचे सरसकट पंचनामे करून मदत द्यावी; शेतकरी संघटनांची मागणी; तहसीलदारांना निवेदन
माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते सायंखिंडी मंदिराचे कलशारोहण; हनुमान जयंती निमित्त मंदिर प्राणप्रतिष्ठा  मोठ्या उत्साहात
सोलर योजनेत शेतकऱ्याची फसवणूक

अकोले : तालुक्यातील विश्रामगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोकणवाडी येथे हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर बाल भैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात पार पडला. चैत्र पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मानाची काठी व मानाचा ढोल खेड भैरवनाथाच्या दर्शनानंतर कोकणवाडीत आणण्यात आला. दुपारी ढोल-ताशे व डी.जे.च्या तालावर गावकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

 दरम्यान, अवकाळी पावसामुळे मिरवणुकीत काहीसा व्यत्यय आला. मात्र पावसाची पर्वा न करता तरुण मित्र मंडळ व ग्रामस्थांनी मिरवणूक अखंड सुरू ठेवत भक्तीभावाने काठी भैरवनाथाच्या दर्शनासाठी नेली. यात्रोत्सवानिमित्त रात्री अंबेवगण लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सरपंच सुलोचना संतू जाधव, उपसरपंच जगन किसन लोहरे व मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी कामगार कमिटीचे भाऊ बेंडकोळी, एकनाथ गोडे, तुकाराम बेंडकोळी, विठ्ठल जाधव, बहिरू जाधव, ज्ञानेश्वर जाधव, भागवत जाधव, भगवान जाधव तसेच महादर्पणचे प्रतिनिधी संतू जाधव, दत्तू  जाधव, प्रकाश जाधव, विकास जाधव यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS