Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जायनावाडीत ‘पेसा कायदा’ मार्गदर्शन शिबीर

अकोले : तालुक्यातील जायनावाडी येथे ‘पेसा कायदा’ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुका पेसा व्यवस्थापक बन्या बापू सहाणे व स्वच्छ भारत समूह

अकोलेत ४८ दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
भंडारदरा शताब्दीपूर्वी विस्थापितांचा प्रश्न सोडवा; कार्यवाही न झाल्यास धरण शताब्दी कार्यक्रम उधळून लावू; किसान सभेचा इशारा
शरद पवारांच्या योगदानामुळे रयत शिक्षण संस्थेची उंची वाढली

अकोले : तालुक्यातील जायनावाडी येथे ‘पेसा कायदा’ मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. तालुका पेसा व्यवस्थापक बन्या बापू सहाणे व स्वच्छ भारत समूह समन्वयक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले.

 या शिबिरात २४ डिसेंबर १९९६ रोजी लागू झालेल्या ‘पेसा कायदा’ची सविस्तर माहिती देण्यात आली. भारतीय राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचीत समाविष्ट असलेल्या अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी समुदायांना स्वशासनाचे अधिकार देणारा हा महत्त्वपूर्ण कायदा असून ग्रामसभेला केंद्रस्थानी ठेवून जमीन, पाणी, वनसंपदा तसेच स्थानिक संस्कृतीचे संरक्षण करण्याचे अधिकार यात प्रदान करण्यात आले आहेत.

 यावेळी पेसा कायदा व वनहक्क कायद्याबाबत मार्गदर्शन करताना ग्रामसभेचे वैधानिक अधिकार व जबाबदाऱ्या, वनहक्क दावे सादर करण्याची प्रक्रिया, अनुसूचित क्षेत्रातील नागरिकांचे हक्क तसेच विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. 

 गावागावात पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांची उभारणी करण्यात यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 

 या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी विशाल धांडे, पेसा व्यवस्थापक बन्या बापू सहाणे, समन्वयक अशोक कडलग, पेसा अध्यक्ष काळू भांगरे, सोमनाथ भांगरे, राजू भांगरे, पांडुरंग भांगरे, सीआरपी कावेरी भांगरे, अंगणवाडी सेविका अलका भांगरे यांच्यासह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी गोरख भांगरे यांनी आभार मानले.

COMMENTS