Homeताज्या बातम्या

युक्रेनमधील क्षेपणास्त्र हल्ल्यात चार भारतीयांचा मृत्यू; व्यापारी मालवाहू जहाजावर हल्ल्यानंतर भारताचा तीव्र निषेध

नवी दिल्ली: युक्रेनमधील ओडेसा बंदर परिसरात व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून आणखी एक

नांदेड पोलिसांचा अवैध धंद्यांवर धडक प्रहार; ’मास रेड’मध्ये ३६.६० लाखांचा मुद्देमाल जप्त
शेख महंमद बाबा दर्गाह येथे मोहरमनिमित्त ताजियाची स्थापना; आज विसर्जन तर रविवारी महाप्रसादाचे आयोजन
खा. वाकचौरेंच्या नेतृत्वात १०० शिवसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला शिर्डीत मोठे खिंडार
Russia-Ukraine War : चार भारतीय खलाशांचा युक्रेनमध्ये मृत्यू

नवी दिल्ली: युक्रेनमधील ओडेसा बंदर परिसरात व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात चार भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून आणखी एक भारतीय नागरिक गंभीर जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे काळ्या समुद्रातील व्यापारी जलवाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. भारत सरकारने या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध नोंदवत मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच जखमी भारतीयाला आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओडेसा बंदरातून निघालेल्या ‘एम. व्ही. गोल्डन लिओ’ (M. V. Golden Leo) या मालवाहू जहाजावर १९ जुलैच्या सायंकाळी क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. जहाजावरील चार भारतीय नागरिकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. मृतांमध्ये केरळ राज्यातील खलाशी अखिल जॉयन यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या एका भारतीय नागरिकावर उपचार सुरू आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजावर एकूण १७ कर्मचारी कार्यरत होते, त्यापैकी ५ जण भारतीय नागरिक होते.

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जहाजावर तीन क्रूझ प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. या हल्ल्यामुळे जहाजाला आग लागली आणि मोठे नुकसान झाले. हे जहाज गिनी-बिसाऊ देशाच्या ध्वजाखाली चालवले जात होते. जहाजावर भारत आणि सीरिया येथील कर्मचारी कार्यरत होते तसेच जहाजामध्ये मका भरलेला होता. हल्ल्यानंतर तातडीने शोध व बचाव मोहीम राबवून आठ जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली. मात्र जहानावरील सागरी मार्गदर्शक अधिकाऱ्यासह अनेकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

भारतीय दूतावास सतत संपर्कात

युक्रेनमधील भारतीय दूतावास स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या सातत्यपूर्ण संपर्कात असून जखमी भारतीय नागरिकाच्या उपचारांपासून ते मृतांचे पार्थिव मायदेशी पाठवण्यापर्यंत सर्व आवश्यक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मृतांच्या कुटुंबियांशीही संपर्क साधण्यात आला असून त्यांना आवश्यक ती मदत दिली जात आहे. मृतांमध्ये केरळमधील खलाशाचा समावेश असल्याची माहिती समोर आल्यानंतर केरळ सरकारनेही तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

COMMENTS