Homeताज्या बातम्या

एमबीबीएस चा कट ऑफ यंदा घसरणार !

नांदेड : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट-यूजी 2026) अंतर्गत घेण्यात आलेल्या री-नीट परीक्षेचा पेपर यंदा अपेक्षेपेक्षा अधिक कठीण आल्याने वै

22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात पेपर लीक प्रकरणात सीबीआय चौकशी करा- नितीन सोनवणेभारत सरकारचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या
नीट फेरपरीक्षेलाही पेपरफुटीचे सावट?; ‘20 लाखांत 620+ गुण’ मिळवून देण्याचे आमिष, सोशल मीडियावर एजंटांची टोळी सक्रियफेरपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकाच विक्रीसाठी असल्याचा दावा; विद्यार्थी-पालकांची फसवणूक करण्याचा संशय, नांदेडमध्येही चर्चांना उधाण
नीट परीक्षा रद्द करण्याची नामुष्कीपेपरफुटीमुळे निर्णय ; देशातील 23 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती परीक्षा


नांदेड : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट-यूजी 2026) अंतर्गत घेण्यात आलेल्या री-नीट परीक्षेचा पेपर यंदा अपेक्षेपेक्षा अधिक कठीण आल्याने वैद्यकीय प्रवेशाच्या स्पर्धेचे चित्र बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेषतः भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांतील अवघड प्रश्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेचे आणि अचूकतेचे मोठे आव्हान पेलावे लागले.
शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या प्राथमिक विश्लेषणानुसार, यंदा 720 पैकी पूर्ण गुण मिळवणारा विद्यार्थी असण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे ऑल इंडिया रँकिंगमध्येही मोठे बदल अपेक्षित आहेत. कठीण प्रश्नपत्रिकेचा थेट परिणाम सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी लागणार्‍या कट-ऑफवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुरक्षित गुणसंख्या 530 ते 550 दरम्यान राहू शकते. तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ही मर्यादा सुमारे 400 गुणांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. 700 पेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना सर्वोच्च क्रमांक मिळण्याची शक्यता असून, अंतिम चित्र मात्र अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अफवा किंवा अंदाजांवर विश्वास न ठेवता अधिकृत निकालाची प्रतीक्षा करावी, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

COMMENTS