Homeताज्या बातम्या

अखिलिस अनारसेचे ‘नीट यूजी’ परीक्षेत यश

कर्जत  : येथील श्री अमरनाथ विद्यालयाचा विद्यार्थी अखिलिस अनारसे यांनी नीट युजी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवत देशामध्ये 821 वा क्रमांक मिळवत कर्जतच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.जिद्द, अथक परिश्रम आणि आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव मनात ठेवून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते, याचे उत्तम उदाहरण कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी अखिलिस सतीश अनारसे  याने घालून दिले आहे. राष्ट्रीय स्तरावरील NEET-UG 2026 परीक्षेत सचिनने 720 पैकी 661 गुण मिळवत देशपातळीवर ऑल इंडिया रँक (AIR) 821 प्राप्त केली आहे. या उज्ज्वल यशामुळे कोरेगावसह संपूर्ण कर्जत तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.कर्जत येथील यशवंत शिक्षण संस्थेच्या  अमरनाथ विद्यालयात मध्ये शिक्षण घेणारा अखिलिस अनारसे याचे  वडील सतीश  अनारसे  हे श्री अमरनाथ विद्यालयामध्ये पर्यवेक्षक असून,शेती व्यवसाय करतात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कष्टाच्या बळावर त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी सातत्याने पाठबळ दिले. आई-वडिलांनी घेतलेले कष्ट, त्याग आणि विश्वास याचे चीज करत  दिवसरात्र मेहनत, नियोजनबद्ध अभ्यास आणि चिकाटीच्या जोरावर हे यश अखिलिसने यश संपादन केले.त्याचे यशवंत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव ,सर्व सदस्य, प्राचार्य व शिक्षकांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपमन्यु शिंदे, तोरडमल , संतोष काळे  यांनी अभिनंदन केले.

स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्ननीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप; शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर तीव्र टीका
नीट परीक्षा रद्द करण्याची नामुष्की !
NEET पेपर लीक प्रकरणाचे धागेदोरे बिहारपर्यंत. बिहारमध्ये एमबीबीएस विद्यार्थ्यांसह सॉल्वर गँगचा पर्दाफाश, बनावट प्रवेशपत्रे आणि रोकड जप्त

COMMENTS