Homeताज्या बातम्या

पिकविमा व सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत शेतकरी हक्क मोर्चाचा संघर्ष सुरूच राहणार; म्हासापूर येथे शासन निर्णयाची होळी

बीड: पंढरपूर येथील आंदोलनानंतर शेतकर्‍यांच्या कर्जमाफीतील अटी व शर्ती रद्द करून शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र

मंत्री पंकजाताईंनी दिलेला शब्द गोपीनाथ गडावरून केला पूर्णदिवंगत हाजी एजाज देशमुख यांच्या कुटुंबियांना 5 लाखांचा धनादेश सुपूर्दसलीम जहाँगीर यांचा पाठपुरावा ; गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदतीचा हात
बारामतीत अजितदादांच्या पुतळ्याचे लोकार्पण; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अनावरण
जंतर-मंतर लाठीचार्जच्या निषेधार्थ नरसी-नायगावात तीव्र आंदोलन; महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड: पंढरपूर येथील आंदोलनानंतर शेतकर्‍यांच्या कर्जमाफीतील अटी व शर्ती रद्द करून शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने बीड तालुक्यातील म्हासापूर येथे कर्जमाफीच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली.

यावेळी शेतकरी पुत्र तथा शेतकरी हक्क मोर्चाचे राजेंद्र आमटे यांनी सांगितले की, जोपर्यंत बीड जिल्ह्यातील प्रत्येक शेतकर्‍याला मागील पिकविम्याचा लाभ मिळत नाही आणि शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत शेतकरी हक्क मोर्चाचा शासनाविरोधातील संघर्ष सुरूच राहणार आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक अतिवृष्टी होऊन अनेक गावांमध्ये पाणी शिरले, पिकांचे मोठे नुकसान झाले. तरीही बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मागील वर्षाचा पिकविमा अद्याप मिळालेला नाही. बीड जिल्ह्याला पिकविमा लाभापासून का वगळण्यात आले, असा सवाल शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.

शेवटच्या शेतकर्‍यापर्यंत कर्जमाफीचा लाभ आणि बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पिकविमा मिळेपर्यंत शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने गावोगावी जाऊन शासनाच्या निर्णयाची होळी तसेच पिकविम्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचेही राजेंद्र आमटे यांनी सांगितले. म्हासापूर येथे झालेल्या या आंदोलनावेळी राजेंद्र आमटे यांच्यासह युवा नेते नितीन खांडे, नवनाथ राऊत, गणेश राऊत, अजय खांडे, कृष्णा खांडे, अशोक राऊत, अनिकेत खांडे, सखाराम खांडे, कलीम शेख, पोपट कुरडे, पिंटू राऊत, पिंटू खांडे, कल्याण राऊत, श्रीकृष्ण पाटोळे, रामेश्वर राऊत, त्रिंबक खांडे, राजेंद्र राठोड, अतुल राऊत, सचिन खांडे आदी उपस्थित होते.

COMMENTS