नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर कविता मुळे यांनी सिडको क्षेत्रीय कार्यालयाला भेट देत विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली.

नांदेड : नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर कविता मुळे यांनी सिडको क्षेत्रीय कार्यालयाला भेट देत विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. आढावा बैठकीच्या निमित्ताने त्यांनी कार्यालयातील मूळ दस्तऐवजांच्या संचिका, दैनंदिन कामकाज, स्वच्छता तसेच मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेतला.
महापौर मुळे यांनी नाव परिवर्तन, आस्थापना, लेखा, गुंठेवारी, माहितीचा अधिकार तसेच जन्म-मृत्यू विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित विभाग प्रमुखांनी मूळ कागदपत्रांच्या संचिका व्यवस्थित ठेवण्यासह दैनंदिन कामकाजाची माहिती महापौरांना दिली. मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट सातत्याने पूर्ण केल्याबद्दल महापौरांनी अधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, गिरीश कदम, सहाय्यक आयुक्त नितीन गाढवे, गुलाम सादेक, सतीश ढवळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांनी महापौरांचे स्वागत केले. यावेळी कार्यालय अधीक्षक विलास गजभारे, कर निरीक्षक वसंत कल्याणकर, संजय नागापूरकर, मारोती सारंग, प्रकाश दर्शने, मालु एनफळे, पवळे, रमेश यशवंतकर, स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे, अर्जुन बांगडी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. बैठकीस भाजपचे नगरसेवक संजय घोगरे, अभिषेक सौदे, नगरसेवक प्रतिनिधी राजू पाटील काळे, संजय मोरे आणि गणेश काकडे यांचीही उपस्थिती होती.

COMMENTS