Homeताज्या बातम्या

देगलूर पोलिसांचा चोरट्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’!

आंतर: देगलूर शहरातून दुचाकी चोरी करून त्या तेलंगणा, कर्नाटक आणि लातूर जिल्ह्यात विक्री करणार्‍या आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांचा देगलूर पोलिसांनी प

शिरपूर फर्स्टचे MSEB कार्यालयावर ठिय्या आंदोलन
आमदार-खासदार 50-50 कोटींना विकले जातायतराज ठाकरेंची जैन मुनींसह भाजपवर घणाघाती टीका
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा एनडीएत विलय होणार? मुख्यमंत्र्यांनी चर्चा फेटाळून लावली!
देगलूर: तमलुर येथे विविध कंपनीचा गुटखा बाळगणाऱ्या आरोपी विरुद्ध देगलूर पोलीस  स्टेशन मध्ये गुन्हा दाखल - Deglur News

आंतर: देगलूर शहरातून दुचाकी चोरी करून त्या तेलंगणा, कर्नाटक आणि लातूर जिल्ह्यात विक्री करणार्‍या आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांचा देगलूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत एका विधी संघर्षग्रस्त बालकाचीही चौकशी केली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल 8 मोटारसायकली असा एकूण 4 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांना 9 ऑगस्ट रोजी काही संशयित इसम चोरीच्या मोटारसायकली वापरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अजय रमेश जाधव (21, रा. आनंदनगर, देगलूर), शेख अमान पी. शेख सलीम (20, रा. आनंदनगर, भाय्येगाव रोड, देगलूर) तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी तेलंगणा, कर्नाटक आणि लातूर जिल्ह्यातून मोटारसायकली चोरी करून त्या विक्रीसाठी आणल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींपैकी एका दुचाकीबाबत चाकूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. त्यामुळे पुढील तपासासाठी संबंधित आरोपींना चाकूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 81/2026, कलम 124 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांच्या सूचनेनुसार डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक महाजन मैसनवाड आणि त्यांच्या पथकाने केली. कारवाईत पोलीस अंमलदार किरणकुमार वाघमारे, मोहम्मद इमरान, वैजनाथ मोटरगे, शिवाजी आडबे, विशाल अटकोरे, श्रीनिवास चिंदमवार, गणेश बोदेमवाड तसेच महिला अंमलदार शेख रिहानाबानू यांनी सहभाग घेतला.

COMMENTS