Homeताज्या बातम्या

तामसा आरोग्य केंद्रात 83 गरोदर मातांची तपासणी; प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

तामसा : जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, तामसा येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर मातांसाठी विशेष आरोग्य तप

तामसा येथे डेंग्यूसदृश्य आजाराने चार वर्षीय बालकाचा मृत्यू; शहरात भीतीचे वातावरण
किरकोळ वादातून परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण
टंचाई विभागातील कर्मचारी कायम गैरहजर? पत्रकारांच्या पाहणीत टेबल रिकामे; हालचाल नोंदीबाबतही प्रश्न उपस्थित
PM Safe Motherhood Campaign 10 Years | Uttarakhand High Risk Pregnancies

तामसा : जागतिक आदिवासी दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र, तामसा येथे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर मातांसाठी विशेष आरोग्य तपासणी व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून 83 गरोदर मातांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर गरोदर मातांची रक्तदाब, वजन, उंची, रक्त व लघवी तपासणी तसेच गर्भाची वाढ आणि हृदयाचे ठोके तपासण्यात आले. उच्च जोखमीच्या गरोदर मातांची ओळख करून आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी हदगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी संतुलित आहार, नियमित तपासणी, प्रसूतिपूर्व काळजी आणि सुरक्षित प्रसूतीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन तामसा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिनी सूर्यवंशी यांनी केले. आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. गरोदरपणातील नियमित तपासणी, योग्य आहार आणि वेळेवर उपचारामुळे माता व बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मोठी मदत होते. ग्रामीण व दुर्गम भागातील मातांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज आहे, असे डॉ. मुरमुरे यांनी सांगितले.

COMMENTS