Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १९ कामगारांचा मृत्यू; ६ जखमी

तामिळनाडू : फटाके बनविणाऱ्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात तब्बल १९ कामगारांचा मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाले आहेत. काही कामगार ढिगाऱ्याखाली द

गोव्यातील मंड्रेम बीच परिसरात तीन कॉटेजला भीषण आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल
जळगाव एमआयडीसीत अग्नितांडव! सिलिंडर स्फोटाने भीषण आग; तीन कंपन्या खाक, सुदैवाने जीव वाचले!
दिल्लीत आगीच्या ज्वाळांपासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने केला विजेच्या तारांवरून थरारक प्रवास
Tamil Nadu : तामिळनाडूत भीषण स्फोट; फटाका कारखान्यात 20 जणांचा मृत्यू, अनेक  जखमी | tamil nadu virudhunagar firecracker factory blast death toll update  india

तामिळनाडू : फटाके बनविणाऱ्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात तब्बल १९ कामगारांचा मृत्यू झाला, तर ६ जण जखमी झाले आहेत. काही कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त होत आहे. रविवारी दुपारी विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनारपट्टी येथे ही दुर्घटना घडली असून, स्फोटानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलीस व अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, कट्टनारपट्टी येथील ‘वानजा फायरक्रॅकर’ कारखान्यातील एका युनिटमध्ये अचानक स्फोट झाला. त्यानंतर स्फोटाचे लोळ इतर चार युनिटपर्यंत पोहोचल्याने आगीने भीषण रूप धारण केले.
स्फोटाचा प्रचंड आवाज झाल्यानंतर आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसर कवेत घेतल्याने कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही कामगारांनी जीव वाचवण्यात यश मिळवले, मात्र अनेकांना पळण्याची संधीही मिळाली नाही. स्फोट इतका तीव्र होता की, परिसरातील इमारतींचेही नुकसान झाले आहे.
पोलीस अधीक्षक श्रीनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १९ कामगारांचा मृत्यू झाला असून ६ जखमींवर उपचार सुरू आहेत. स्फोटाच्या वेळी संबंधित युनिटमध्ये सुमारे ३० कामगार काम करत होते. अग्निशामक दलाने तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. त्यानंतर ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले.
दरम्यान, स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून फटाके तयार करताना झालेल्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS