Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जनगणना पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या बदल्यांना ब्रेक जनगणना कामासाठी नियुक्त; ग्रामविकास विभागाचा निर्णय

मुंबई : आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा परिषद शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांना यंदा स्थगिती देण्याचा निर्णय घेतला

शिक्षकांच्या बदल्यांना यंदा ‘ब्रेक’! जनगणनेच्या कामामुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय
पगाराविना विकास कसा? जेजेएम-एसबीएम कर्मचार्‍यांचा सवाल; महिनोनमहिने वेतन थकले; राज्यभर असहकार आंदोलन, धरण्याचा इशारा
झेडपी निवडणुकांबाबत मोठी बातमी! आरक्षण बदलणार, डिसेंबरमध्ये निवडणुकांची शक्यता
ZP Teachers Transfer Postponed | जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या यंदा  होणार नाहीत; पाहा सरकारचा निर्णय

मुंबई : आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा परिषद शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांना यंदा स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. जनगणनेच्या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला असून यासंदर्भातील पत्र सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
  केंद्र सरकारने २०२७ च्या जनगणनेचे देशव्यापी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल. तर १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व गणना केली जाईल. या दरम्यान सुमारे २ लाख ६४ हजार प्रगणक आणि पर्यवेक्षक प्रत्यक्ष घरांना भेटी देऊन डिजिटल पद्धतीने माहिती संकलित करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील जनगणना कामाशी संबंधित क आणि ड वर्ग संवर्गातील कर्मचारी तसेच सर्व जिल्हा परिषद शिक्षकांची यंदा बदली न करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाच्या उपसचिव वैशाली डिगे यांनी शुक्रवारी यासंदर्भातील पत्र सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. केंद्रीय गृह सचिवांच्या अर्धशासकीय पत्राच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने कर्मचारी, शिक्षकांच्या बदल्यांबाबत हा निर्णय घेतला आहे.

COMMENTS