Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॅबिनेट मंत्र्याच्या पीएचा पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न; वाचवायला आलेल्या मुलालाही बॅटने मारहाण

https://www.youtube.com/watch?v=nKx5pE8PsVQ महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. भाजपचे कॅबिनेट मंत्री

मंत्री सावेंच्या ओएसडीवर पुण्यात गुन्हा; पत्नी आणि मुलावर हल्ला करत मारहाण केल्याचा आरोप
सत्तेच्या माजात हैवानपणा! मंत्र्यांच्या माजी ओएसडीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न; चिमुकल्यालाही बेदम मारहाण
भाजप कॅबिनेट मंत्र्याच्या पीएचा पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न; वाचवायला आलेल्या पोटच्या मुलालाही बॅटने मारहाण!

महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. भाजपचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) (पीए) विजय धुलचंद कारंडे यांच्यावर पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

विजय कारंडे हे मोबाईलवर चॅटिंग करत असताना त्यांच्या ३० वर्षीय पत्नीने मोबाईलचा पासवर्ड मागितला. या क्षुल्लक कारणावरून संतापलेल्या कारंडे यांनी पत्नीला क्रिकेटच्या बॅटने बेदम मारहाण केली आणि तिचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आईला वाचवण्यासाठी मधे आलेल्या त्यांच्या लहान मुलालाही कारंडे यांनी बॅटने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

विजय कारंडे हे मूळचे नांदेड येथील समाजकल्याण विभागात कार्यरत आहेत, मात्र सध्या ते मंत्रालयात मंत्री अतुल सावे यांचे OSD म्हणून प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे पोलीस उपायुक्त शिवंकर यांनी सांगितले.

COMMENTS