Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

कर्नाटकात दहावीच्या निकालपत्रातून ‘मराठी’ गायब?सीमाभागात संताप; कर्नाटक सरकारवर टीकेची झोड

मुंबई : कर्नाटकातील सीमाभागात पुन्हा एकदा भाषा-विषयक वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. दहावीच्या निकालपत्रांमध्ये ‘मराठी’ या विषयाचा उल्लेखच नसल्या

आरक्षण नावापुरतेच? आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थिनीचा बसमध्ये अपमान; पालकाचा संताप, शिक्षण विभागाकडे तक्रार
किनवट आरोग्य विभागात ’लक्ष्मी दर्शन’चा विळखा; ’आशा’ स्वयंसेविकेच्या हक्कावर भ्रष्टाचाराची कुर्‍हाड!
प्रतापगडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या

मुंबई : कर्नाटकातील सीमाभागात पुन्हा एकदा भाषा-विषयक वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. दहावीच्या निकालपत्रांमध्ये ‘मराठी’ या विषयाचा उल्लेखच नसल्याचा आरोप समोर आला असून, संबंधित ठिकाणी भाषेच्या जागी कोरा रकाना ठेवून फक्त गुण नमूद केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सीमाभागातील काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये भाषेचा उल्लेख अपेक्षित असताना तो टाळण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ‘मराठी’ ऐवजी कोणतेही नाव न देता रिकामी जागा ठेवण्यात आल्याने हा प्रकार केवळ प्रशासकीय त्रुटी नसून जाणीवपूर्वक केला गेला असावा, अशी शंका व्यक्त होत आहे. यामुळे शैक्षणिक कागदपत्रांच्या विश्‍वसनीयतेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक मराठी संघटना आणि कार्यकर्त्यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. मराठी भाषेचे अस्तित्व आणि ओळख कमी लेखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सीमाभागात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या भाषिक तणावाच्या पार्श्‍वभूमीवर ही घटना अधिक संवेदनशील ठरत आहे. भाषेचा उल्लेख टाळणे म्हणजे केवळ शब्द वगळणे नाही, तर ओळख नाकारणे आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. या प्रकाराविरोधात मराठी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली असून, प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे. जर दुरुस्ती झाली नाही, तर व्यापक आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम सूर कार्यकर्त्यांकडून उमटत आहे.

महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी
या प्रकरणाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी सीमाभागातून पुढे आली आहे. केंद्र सरकारकडे अधिकृत तक्रार नोंदवून या मुद्द्यावर तोडगा काढावा, असेही सांगितले जात आहे. मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने प्रश्‍न अधिकच गंभीर बनला आहे.

COMMENTS