Homeताज्या बातम्यादेश

बिल्किस बानो गुन्हेगारांच्या सुटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात

नवी दिल्ली प्रतिनिधी - 2002 च्या गुजरात दंगलीत सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या 11 जणांच्या सुटकेला बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्

लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीची हत्या
अखेर सुजीत पाटकरला पोलिसांनी केली अटक
कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरूच

नवी दिल्ली प्रतिनिधी – 2002 च्या गुजरात दंगलीत सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या 11 जणांच्या सुटकेला बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. एका दोषीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते की, गुजरात सरकार 1991 च्या माफी धोरणानुसार दोषींना सोडू शकते. त्या निर्णयाच्या आधारे गुजरात सरकारने सर्व 11 जणांची सुटका केली होती.
2002 च्या गुजरात दंगलीच्या वेळी झालेल्या सामूहिक बलात्कार व सात जणांच्या खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 11 गुन्हेगारांना शिक्षामाफी देण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयाला बलात्कार पीडित बिल्किस बानो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी या याचिकेवर विचार केला जाईल, असे म्हटले आहे. बिल्किस बानो 21 वर्षांची होती जेव्हा पुरुषांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला, ज्याने तिच्या तीन वर्षांच्या मुलीसह तिच्या कुटुंबातील नऊ सदस्यांना ठार केले, 2002 मध्ये गोध्रा ट्रेन जाळल्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत 59 यात्रेकरू मरण पावले. 2002 साली उसळलेल्या गुजरात दंगलीतल्या सर्वांत भयंकर घटनेपैकी एक म्हणजे बिल्किस बानो यांचे प्रकरण. या दंगलीमुळे बिल्किस बानो याचं आयुष्यच बदलून गेल. या दंगलीमध्ये पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या 18-19 वर्षांच्या बिल्किस बानोवर यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. बिल्किस बानोवर यांच्या तीन वर्षांच्या चिमूरडीला तिच्या डोळ्यांदेखत जमिनीवर आपटून तिची हत्या करण्यात आली. बिल्किस बानो यांची आई, दोन दिवसांचीच बाळांतीण असलेली बहिण यांच्यासह तिच्या 14 नातलगांचा संतप्त जमावाने जीव घेतला. या घटनेने बिल्किस आणि तिचे पती याकून दोघोचही आयुष्य बदलून गेले. गेली 17 वर्षं जीवाच्या भीतीने त्यांना वणवण भटकावे लागले. ओळख लपवून रहावे लागले. वीसहून जास्त घरे बदलावी लागली. एकप्रकारे भटक्या स्वरूपाच जगण त्यांच्या नशिबी आले.

COMMENTS