Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांना लेखन कलेत अनेक संधी- डॉ.ऋचा शर्मा

नगर-  महिलांना लेखन कलेत अनेक संधी आहेत. फिल्म गीत‚ पटकथा लेखन‚ नाटक‚ पत्रकारिता‚ अनुवाद अशा विविध क्षेत्रांत महिला अग्रेसर आहेत. साहित्य लेखनात म

आदिवासी पारधी समाजाच्या समस्या बाबत चर्चासत्र संपन्न
कोतवाली पोलिसांनी काही तासातच भामट्याच्या आवळ्या मुसक्या
नगर लसीकरण केंद्रात पुन्हा वाढदिवसाचा धूम धडाका l पहा LokNews24

नगर- 

महिलांना लेखन कलेत अनेक संधी आहेत. फिल्म गीत‚ पटकथा लेखन‚ नाटक‚ पत्रकारिता‚ अनुवाद अशा विविध क्षेत्रांत महिला अग्रेसर आहेत. साहित्य लेखनात महिलांचे योगदान मोलाचे ठरत आहे. महिला विविध विषयावर संवेदनशील करत आहेत. यातुन महिलांचे विविध प्रश्न समोर येत आहेत व त्यावर समाधान ही शोधले जात आहेत. आज सर्व क्षेत्रांत स्त्रियां आपले अस्तीत्व सिद्ध करत आहे. साहित्यात ही महिलांनी पुढे यावे, असे आवाहन कथा लेखिका प्रो.डॉ.ऋचा शर्मा यांनी केले. 

अहमदनगर महाविद्यालयात एनएसएस व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त व्याख्यानमालेत ‘स्वातंत्र्यानंतर साहित्य क्षेत्रात महिलांचे योगदान’ या विषयावर त्या बोलत होत्या.   या कार्यक्रमासाठी अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून राधाबाई काळे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा.विश्वास काळे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून सी.टी.बोरा. महाविद्याल‚ शिरूर चे माजी प्राचार्य प्रा.डॉ.सुरेशकुमार जैन उपस्थित होते. 

डॉ. ऋचा शर्मा यांना उत्तर प्रदेश सरकाचा पत्रकारितेमधील डॉ.धर्मवीर भारती पुरस्कार मिळाल्याबदल सत्कार वृक्ष देऊन करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा.अशोक घोरपडे यांनी केले. तर डॉ.पूर्णिमा बेहरे यांनी आभार मानले. याप्रसंगी सययद फिरदोस‚ कार्तिक पवार या विद्यार्थ्यांनी वरील सर्व कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेत कार्यक्रम सफल करण्यासाठी परिश्रम घेतले.

COMMENTS