Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑपरेशन क्रॅकडाउनची धडक कारवाई : इस्लापूर परिसरात अवैध दारूवर मोठा प्रहार

नांदेड : इस्लापूर ग्रामीण भागातील अवैध दारू निर्मिती व त्यातून वाढणार्‍या गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलाने ऑपरे

अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांची अवैध व्यवसायांवर धडक कारवाई मोहीम
पाथर्डी पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक शंकरवाडीत गावठी हातभट्टी उद्ध्वस्त, लाखाचा मुद्देमाल जप्त!। लोकमंथन News२४
शिक्षणाच्या माहेरघरात आता ’नशेची’ गंगा? गोकुंद्यात नव्या ’बार’साठी हालचाली; ग्रामपंचायत प्रशासनाची ’अर्थपूर्ण’ डोळेझाक!

नांदेड : इस्लापूर ग्रामीण भागातील अवैध दारू निर्मिती व त्यातून वाढणार्‍या गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम घालण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलाने ऑपरेशन क्रॅकडाउन अंतर्गत इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी संयुक्त कारवाई राबवली. मौजे शिवनीसह आसपासच्या दुर्गम भागात पहाटे चार वाजल्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत पोलिसांनी नियोजनबद्ध आणि समन्वयित पद्धतीने धडक कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या भागात पूर्वीपासून हातभट्टी दारू निर्मितीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सखोल अभ्यास केला. अत्यंत गोपनीयतेने आखलेल्या या कारवाईत इस्लापूर पोलीस ठाण्यासह एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, दहा अधिकारी, 105 पोलीस अंमलदार आणि दोन आरसीपी प्लाटूनचा सहभाग होता. कारवाईदरम्यान पोलिसांनी हातभट्टी दारूशी संबंधित तब्बल 22 गुन्हे दाखल केले. सुमारे 17 हजार 250 लिटर मोहामास सडवा (अंदाजे किंमत 8.62 लाख), 166 लिटर हातभट्टी दारू (16 हजार), 1,500 किलो मोहफुले (45 हजार) जप्त करण्यात आली. याशिवाय रसायनमिश्रित सिंधी प्रकरणी दोन गुन्हे नोंदवून 2 हजार 700 लिटर साठा (54 हजार) जप्त करण्यात आला. गुटखाविरोधातही एक कारवाई करत 48हजार 840 किमतीचा माल हस्तगत करण्यात आला. एकूण सुमारे 10.26 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून अवैध वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या वाहनांवरही कारवाई सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत 25 आरोपी निष्पन्न झाले असून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे या मोहिमेदरम्यान स्थानिक नागरिक व महिला भगिनींनी पोलिसांना सक्रिय सहकार्य केले, याबद्दल पोलीस प्रशासनाने त्यांचे आभार मानले आहेत. नांदेड जिल्हा पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थ, अवैध दारू, शस्त्रास्त्र, जुगार किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांबाबत माहिती असल्यास ती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा 112 या हेल्पलाईन क्रमांकावर कळवावी. माहिती देणार्‍याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ऑपरेशन क्रॅकडाउन अंतर्गत झालेली ही कारवाई ग्रामीण भागातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची ठोस भूमिका दर्शवणारी ठरली असून, अशा मोहिमा पुढेही सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

COMMENTS