Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाव्होली येथे विविध मान्यवरांचा उत्साहात सत्कार

नाव्होली : नाव्होली गावात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक

भोंदू मनोहर भोसलेला 3 दिवसांची पोलिस कोठडी; व्यवसायर्चीं नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
कोर्ट-कचेरी सोडून पंचांकडून थेट ‘जलपरीक्षा’; राजस्थानमधील संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद
७० वर्षीय आजोबाचे नातीवर अतिप्रसंगचा प्रयत्न; पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल; भोरमधील हत्येनंतर पुण्यात दुसरी हादरवणारी घटना

नाव्होली : नाव्होली गावात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम सरपंच रणजीत बप्पा बिक्कड यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी इंदुबाई रणजीत बिक्कड यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान आदर्श गाव निर्मितीसाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. या सोहळ्यात भारतरत्न पुरस्कार प्राप्त शाळा तसेच त्या शाळेतील शिक्षक व शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर पोलीस पाटील पदासाठी नियुक्त झालेल्या छाया बिक्कड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. छाया अंकुश बिक्कड/घुले यांनी यापूर्वी 11 महिने संबंधित शाळेत करार तत्त्वावर उत्कृष्ट सेवा बजावली होती. त्यांच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीमुळे त्यांना या पदाची संधी मिळाल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमात मानसतज्ञ व समुपदेशक मनीषा नामदेव बिक्कड/घुले यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत अंधश्रद्धा निर्मूलनाचे महत्त्व पटवून दिले. अंधविश्वासांना बळी न पडता वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, तसेच प्रत्येक महिलेने आपल्या भावना निर्भयपणे व्यक्त कराव्यात, असे त्यांनी सांगितले. किशोरवयीन मुलांसाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध असल्याने शाळांमध्ये विविध समुपदेशन कार्यक्रम राबवावेत, अशी विनंतीही त्यांनी केली. मानसिक आरोग्य जपण्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढे येणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

COMMENTS