अहिल्यानगर : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विविध विद्यार्थी प्रश्नांसाठी सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांनी प्रत्यक्ष भेट देत पाठिंबा जाहीर केला. उपोषणस्थळी जाऊन त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही दिली.दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनात विविध स्पर्धा परीक्षा, भरती प्रक्रिया आणि विद्यार्थ्यांच्या इतर प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी खासदार लंके यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या काळजीपूर्वक ऐकून घेत सरकारने त्यावर सकारात्मक भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली.यावेळी त्यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकशाही व्यवस्थेत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असून अशा आंदोलनांना दडपशाहीने उत्तर देणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने आणि संवादाच्या माध्यमातून पाहिले गेले पाहिजे, असेही ते म्हणाले.विद्यार्थ्यांचा आवाज दाबून प्रश्न सुटणार नाहीत. त्यांच्या न्याय्य मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्या संसदेतही प्रभावीपणे मांडून न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,असे खासदार लंके यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात आपण कायम त्यांच्या सोबत राहणार असल्याचा पुनरुच्चार करत त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना धीर दिला. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न केवळ त्यांच्या भविष्याशी संबंधित नसून देशाच्या शिक्षण व्यवस्था आणि रोजगार व्यवस्थेशी निगडित असल्याने त्यावर तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

COMMENTS