किनवट : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध साठवणुकीवर आणि विक्रीवर किनवट पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ’ऑ

किनवट : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध साठवणुकीवर आणि विक्रीवर किनवट पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ’ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत तालुक्यातील स्टेशन धानोरा येथे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी 5 लक्ष रुपयाचे वाहनासह तब्बल 9 लाख 72 हजार 480 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, याप्रकरणी वाहीद मजीद मोमीन रा. धानोरा, ता. किनवट, अमेर सय्यद खमर सय्यद रा. हिमायतनगर या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैध गुटखा वाहतूक आणि विक्री करणार्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. याच मोहिमेअंतर्गत किनवट पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, मौजे धानोरा (ता. किनवट) येथे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा करण्यात आला आहे. या माहितीच्या आधारे, 19 मार्च 2026 रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी स्टेशन धानोरा येथील आरोपी वाहीद मजीद मोमीन याच्या घरावर आणि महिंद्रा बोलेरो वाहनावर (क्र. एम.एच – 26 – बि.सी-1006) छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत विविध कंपन्यांचा नामांकित गुटखा व पान मसाला तसेच तंबाखू व जर्दा जप्त करण्यात आली आहे. यामध्ये गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी बोलेरो गाडी सुद्धा समाविष्ट असुन एकूण जप्त किंमत: गुटखा 4 लाख 72 हजार 480 रुपये, व 5 लक्ष रुपये बोलेरो वाहनासह 9 लाख 72 हजार 480 रुपये. असे आहे.या प्रकरणी पोलिसांनी वरिल दोन व्यक्तींवर किनवट पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. च्या कलम 123, 223, 274, 275 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या मोहिमेत किनवट पोलीस स्टेशनचे पो.नि गणेश कराड, पोउपनि सागर झाडे, पोहेकाँ आत्राम, डुकरे, पोकाँ अन्नमवार आणि कुडमेते यांनी मोलाची भूमिका बजावली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे

COMMENTS