कोपरगाव शहर : स्पर्धा परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकार, ऑनलाइन परीक्षा पद्धतीतील त्रुटी तसेच पोलीस भरती प्रक्रियेत झालेल्या कथित अन्यायाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) कोपरगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. २४) हे निवेदन सादर करण्यात आले.दिलेल्या निवेदनात महाराष्ट्रातील ऑनलाइन परीक्षा केंद्रांवरील तांत्रिक अडचणी, नेटवर्क समस्या, गैरसोयी आणि उमेदवारांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास याकडेही लक्ष वेधण्यात आले. तसेच राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षा कायमस्वरूपी ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणी करत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ब्लॅकलिस्ट करण्यात आलेल्या कंपन्यांना परीक्षा व भरती प्रक्रियेची जबाबदारी देऊ नये, एनटीए व संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, ऑनलाइन परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करावी, पोलीस भरतीतील कथित अन्यायाची निष्पक्ष चौकशी करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा आणि विद्यार्थी-युवकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा असे निवेदन दिले आहे.या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बापू रंधवणे यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष सचिन मुजगुले, तालुकाध्यक्ष, बापू रांधवणे, शहराध्यक्ष स्वप्नील पवार, तालुका कार्याध्यक्ष तानाजी जाधव, जिल्हा सरचिटणीस सुनील वर्पे,तालुका युवक अध्यक्ष निखिल थोरात, शहर कार्याध्यक्ष रिंकू मगर, सोशल मीडिया अध्यक्ष ऋतुराज काळे, तालुका उपाध्यक्ष शशिकांत सदाफळ, युवक तालुका कार्याध्यक्ष सचिन पाचोरे,युवक तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश गवळी,प्रशांत मेहेरखांब यांच्या सह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS