Homeताज्या बातम्या

मरखेल पोलिसांची मोठी कामगिरी; १ लाख ५७ हजारांचे ७ चोरीचे मोबाईल हस्तगत करून मालकांना केले परत

नांदेड: मरखेल पोलीस ठाण्याच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत चोरीस गेलेले व हरवलेले तब्बल ७ मोबाईल फोन शोधून काढत त्यांच्या मूळ मालकांना परत केले

जग हादरले! व्हेनेझुएलामध्ये ७.५ तीव्रतेचा प्रलयंकारी भूकंप, जपानलाही ६.९ तीव्रतेचे धक्के; १० हजारांहून अधिक मृत्यूची भीती
नायगाव तालुक्यातील काही ग्रामसेवक ‘बिनपत्त्याचे’; मुख्यालयी वास्तव्यास नसल्याने नागरिकांचे हाल
लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण; सामाजिक कार्यकर्ते डॉ. गावीत्रे यांनी केले स्वागत

नांदेड: मरखेल पोलीस ठाण्याच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत चोरीस गेलेले व हरवलेले तब्बल ७ मोबाईल फोन शोधून काढत त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. या हस्तगत केलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १ लाख ५७ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे मरखेल पोलिसांनी ‘सीईआयआर’ (CEIR) पोर्टल व ‘आयएमईआय’ (IMEI) ट्रॅकिंगच्या मदतीने अत्यंत प्रभावीपणे शोधमोहीम राबवली. या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध ठिकाणी वापरात असलेले हे चोरीचे मोबाईल शोधून जप्त करण्यात आले. त्यानंतर आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मूळ मालकांना बोलावून त्यांचे मोबाईल त्यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी मोहिमेत सपोनि रवी हुंडेकर, पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, पोलीस कॉन्स्टेबल नारायण यांगाले आणि पोलीस कॉन्स्टेबल संजय बोचेमवार यांनी विशेष परिश्रम घेतले. मरखेल पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, आपले हरवलेले मौल्यवान मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी मरखेल पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.

COMMENTS