Homeताज्या बातम्या

रोटेगाव येथे मनोरा गाडी मार्गिका व निवारा शेडचे लोकार्पण; विद्युत वरील तारेच्या देखभाल व्यवस्थेला नवे बळ

नांदेड: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील विद्युत वरील तारेच्या (ओएचई) देखभाल व्यवस्था अधिक सक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण

उपवर्गीकरणाविरोधात ३० जूनच्या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन; आझाद मैदानावर ढोर-कक्कया समाजाचे शक्तीप्रदर्शन
देवळाली प्रवरा येथील दोन उद्योजक शेतकरी पुत्रांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विशेष गौरव
नांदेडमध्ये ‘शब्द शब्द तुझाच आहे’ कवितासंग्रहाचे 7 जून रोजी प्रकाशन

नांदेड: दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील विद्युत वरील तारेच्या (ओएचई) देखभाल व्यवस्था अधिक सक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. रोटेगाव यार्ड येथे समर्पित मनोरा गाडी मार्गिका व मनोरा गाडी शेडचे लोकार्पण करण्यात आले असून, नव्याने स्थापन झालेल्या वीज वितरण विभागासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

नांदेड विभागाला नुकत्याच सहा मनोरा गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. या गाड्यांचा वापर विद्युत वरील तारेच्या यंत्रणेची नियमित तपासणी, देखभाल, तांत्रिक बिघाडांवरील तातडीची दुरुस्ती तसेच आपत्कालीन परिस्थितीत पुनर्स्थापना कार्यासाठी करण्यात येणार आहे. रोटेगाव येथे उभारण्यात आलेल्या स्वतंत्र मार्गिका व शेडमुळे या मनोरा गाड्या सुरक्षितरीत्या उभ्या ठेवणे शक्य होणार असून, गरज भासल्यास त्या त्वरित घटनास्थळी पाठवता येणार आहेत.

अंकाई-मुदखेड मुख्य रेल्वेमार्गावरील हे पहिलेच मनोरा गाडी मार्गिका व शेड असल्याने या प्रकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नांदेड विभागाच्या विद्युत वरील तारेच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या सुविधेमुळे तांत्रिक बिघाडांवरील प्रतिसादाचा कालावधी कमी होऊन रेल्वे सेवा पूर्ववत करण्याची प्रक्रिया अधिक जलद व परिणामकारक होणार आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून, प्रवाशांना अधिक दर्जेदार व अखंडित सेवा उपलब्ध होईल. भारतीय रेल्वेच्या सुरक्षित आणि आधुनिक सेवा व्यवस्थेच्या उद्दिष्टाला बळकटी देणारी ही सुविधा भविष्यात नांदेड विभागासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

COMMENTS