Homeताज्या बातम्या

रायफल शूटिंग स्पर्धेत कु. आयुषा भांड हिचे नेत्रदिपक यश

गोंदवले / वार्ताहर : शासकीय अभियंत्रिकी महाविद्यालय पुणे येथे शिकत असलेली बिदाल, ता. माण येथील साहेबराव अनंत भांड यांची नात व कोकण भवन

चिंचोली कुस्ती मैदानात ’कौतुक’ ची बाजी, आत्मलिंग देवाच्या यात्रेनिमित्त आयोजन
युवराज सिंग यांच्या नावाचा गैरवापर रोखा; आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
आंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धेत शिवराज भालेकरला सुवर्णपदक

गोंदवले / वार्ताहर : शासकीय अभियंत्रिकी महाविद्यालय पुणे येथे शिकत असलेली बिदाल, ता. माण येथील साहेबराव अनंत भांड यांची नात व कोकण भवन येथे लेखाधिकारी असलेले संतोष साहेबराव भांड यांची कन्या कु. आयुषी संतोष भांड हिची एनसीसी (वायुसेना) मधील रायफल शूटिंग या खेळाकरीता महाराष्ट्र संघात मुलीमधून तिची एकटीची निवड झाली होती. त्यानंतर अखिल भारतीय एनसीसी वायुसेना यांच्या स्पर्धा जोधपुर, राजस्थान येथे नुकत्याच झाल्या. यामध्ये रायफल शूटिंगमध्ये कु. आयुषी संतोष भांड व इतर दोन मुले यांचा समावेश असलेल्या महाष्ट्राच्या रायफल शूटिंग संघाने भारतात प्रथम क्रमांक मिळवला. कु. आयुषी भांड मिळविलेल्या यशामुळे तिचे बिदालसह माण तालुक्यातुन सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS