Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जामखेड शहरात महावीर जयंती उत्साहात

  जामखेड : जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती मंगळवारी (दि. ३१) जामखेड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व सकल जैन समाजाच्या वतीने जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ८ वाजता भगवान महावीर यांच्या प्रतिमेची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. बीड रोड, छत्रपती चौक, जयहिंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ मार्गे निघालेल्या या मिरवणुकीची सांगता जैन स्थानक येथे झाली. मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत करत जयघोष केला. मिरवणुकीदरम्यान जैन बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची व शीतपेयांची व्यवस्था करण्यात आली होती. अमृत पशुखाद्य व अशा भेळ येथे रोटरी क्लब ऑफ जामखेड शहरच्या पदाधिकाऱ्यांनी ही व्यवस्था केली. तसेच तेजस बेकर्स येथेही पाण्याच्या बाटल्या व शीतपेयांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच पदाधिकारी, संचालक मंडळ, ट्रस्टी व श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावरगाव शिवारात ट्रकचालकावर दरोडा; बारा तासांत आरोपींना जामखेड पोलिसांनी केली अटक
विंचरणा नदीच्या जुन्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्यजामखेडकर जेरीस; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांत संताप
अपघातातील चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

  जामखेड : जैन धर्मातील २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती मंगळवारी (दि. ३१) जामखेड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व सकल जैन समाजाच्या वतीने जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ८ वाजता भगवान महावीर यांच्या प्रतिमेची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. बीड रोड, छत्रपती चौक, जयहिंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पेठ मार्गे निघालेल्या या मिरवणुकीची सांगता जैन स्थानक येथे झाली. मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत करत जयघोष केला.

मिरवणुकीदरम्यान जैन बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची व शीतपेयांची व्यवस्था करण्यात आली होती. अमृत पशुखाद्य व अशा भेळ येथे रोटरी क्लब ऑफ जामखेड शहरच्या पदाधिकाऱ्यांनी ही व्यवस्था केली. तसेच तेजस बेकर्स येथेही पाण्याच्या बाटल्या व शीतपेयांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच पदाधिकारी, संचालक मंडळ, ट्रस्टी व श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS