Homeताज्या बातम्या

मिलींद नगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यातसांडपाण्यासह गटारीचेही पाणी रस्त्यावर

जामखेड : नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक सहा, मिलींद नगर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या गंभीर बाबीकडे नगरपरिषद व नगरसेवकांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तातडीने उपाययोजना करण्याव्यात आंदोलन करण्याची वेळ आणू नका असे सामाजिक कार्यकर्ते संदेश घायतडक यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी नगराध्यक्षा व नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिले आहे.निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते संदेश घायतडक,कांताबाई अंकुश गायकवाड, संजय राजाराम भोसले, उमेश गायकवाड,दिपाली अनिल वाघमारे,संतोष  लक्ष्मण डाडर ,स्वाती अजय डाडर ,संजय छगन वाघमारे, पूनम अशोक कांबळे, नितिन बंडू राऊत, मयूर जाधव, राधा जाधव, सरस्वती गायकवाड ,राजेंद्र गायवाड,अक्षय गायकवाड ,कृष्णा साळवे आदी नागरिकांच्या सह्या आहेत.निवेदनात म्हटले आहे की मिलिंदनगर मधील कांबळे किराणा ते संजय वाघमारे या दरम्यान अंडरग्राऊंड गटारनालीमध्ये सांडपाणी तुंबले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तसेच डासांची वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये थंडी ताप होत आहे. डेंगू सारखे रोग होण्याची शक्यता नाकरता येत नाही.मिलींदनगर परिसरातील छोटे लहान बालकांची संख्या जास्त असून सदरील मुले रस्त्यावर खेळत असतात. त्यामुळे परिसरातील सांडपाण्याची दुरावस्था झाली असून पाणी हे रस्त्यावर येते. मिलींद नगर या परिसरातील स्वच्छते बाबत आपल्या नगरपरिषदेची अनास्था का आहे? हेच समजले नाही. कोणताही स्वच्छता कर्मचारी हा या परिसरात येत नाही व गटार साफ करत नाही.पावसाळ्याचे दिवस असल्याने व गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे, तरी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ पाहणी करून सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लावावी अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. 

तहसील कार्यालयात लोकशाही दिन नियमित घेण्याची मागणी
सुपे येथील कोल्हेवस्ती शाळेचा कायापालटबहुउद्देशीय सभागृह, सौरऊर्जा प्रकल्प व रंगकामाचे लोकार्पण
मृदंगाचार्य संकेत आरोटे ‘संगीत साधक’ पुरस्काराने सन्मानित

COMMENTS