Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेच्या धाडसाने चोरीचा प्रयत्न फसला; चोर रंगेहाथ ताब्यात; जामखेडमधील घटना

जामखेड : शहरासह तालुक्यात चोऱ्यांचे प्रकार वाढत असताना एका महिलेच्या सतर्कता आणि धाडसामुळे चोरीचा प्रयत्न फसल्याची घटना समोर आली आहे. घरात घुसून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला महिलेनेच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात मंगळवार (दि. २० एप्रिल) रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ज्ञानेश्वर भगवान काळे (रा. आघी, ता. जामखेड) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोपट मारूती तेरकर (वय ५५, रा. आघी) यांच्या पत्नी सुमात्राबाई या घरात झोपलेल्या असताना मध्यरात्रीनंतर सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी घरात शिरला. त्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्पर्श झाल्याने सुमात्राबाई यांना जाग आली. परिस्थितीचे भान राखत त्यांनी तत्काळ आरोपीच्या डोक्याचे केस पकडून त्याला घट्ट धरून ठेवले व मोठ्याने ओरडत परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. ग्रामस्थांनी धाव घेत आरोपीला पळून जाण्यापूर्वीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, जामखेडमध्ये अलीकडे मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्या असून या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुमात्राबाई यांनी दाखवलेल्या धाडसाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सरोदे करीत असून, आरोपी हा चोरट्यांच्या टोळीचा भाग आहे का याचा शोध घेतला जात आहे.

ग्रामपंचायत पोट निवडणुकीत काळे गटाचे वर्चस्व
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रा नव्या जलक्रांतीची दिशा; आ. आशुतोष काळे; कुंभारी येथे गोदावरीचे जलपूजन
‘सनराईज’चा बारावीचा १०० टक्के निकाल
जामखेड : दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास तलवारीने मारहाण, पाच जणांविरुद्ध  आर्म ॲक्टनुसार गुन्हे दाखल | Jamkhed Times

जामखेड : शहरासह तालुक्यात चोऱ्यांचे प्रकार वाढत असताना एका महिलेच्या सतर्कता आणि धाडसामुळे चोरीचा प्रयत्न फसल्याची घटना समोर आली आहे. घरात घुसून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला महिलेनेच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात मंगळवार (दि. २० एप्रिल) रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ज्ञानेश्वर भगवान काळे (रा. आघी, ता. जामखेड) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोपट मारूती तेरकर (वय ५५, रा. आघी) यांच्या पत्नी सुमात्राबाई या घरात झोपलेल्या असताना मध्यरात्रीनंतर सुमारे ३.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी घरात शिरला. त्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्पर्श झाल्याने सुमात्राबाई यांना जाग आली.

परिस्थितीचे भान राखत त्यांनी तत्काळ आरोपीच्या डोक्याचे केस पकडून त्याला घट्ट धरून ठेवले व मोठ्याने ओरडत परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. ग्रामस्थांनी धाव घेत आरोपीला पळून जाण्यापूर्वीच पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, जामखेडमध्ये अलीकडे मंगळसूत्र चोरीच्या घटना वाढल्या असून या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुमात्राबाई यांनी दाखवलेल्या धाडसाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सरोदे करीत असून, आरोपी हा चोरट्यांच्या टोळीचा भाग आहे का याचा शोध घेतला जात आहे.

COMMENTS