Homeताज्या बातम्या

राज्य सामायिक प्रवेश परीक्षेत घोटाळा उघडकीस; हायटेक रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांचे गुन्हे दाखल

नांदेड : राज्य सामायिक प्रवेश परीक्षेत (उएढ) हायटेक गैरप्रकार आणि गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ

माजी खा. विनायक राऊतांच्या सुनेचे छळाचे गंभीर आरोपगुन्हा दाखल ; सर्व आरोप निराधार असल्याचे राऊतांचे स्पष्टीकरण
अर्धापूर पोलिसांची धडक कारवाई; 7.82 लाखांचा प्रतिबंधित गुटखा व कार जप्त, दोघांना अटक
गोळेगाव पुतळा प्रकरणातील 8 शिवप्रेमींना जामीन मंजूरअ‍ॅड. आर. एस. खुणे यांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाचा दिलासा
राज्यातील प्रतिष्ठित विद्यापीठात मोठा आर्थिक घोटाळा, शैक्षणिक वर्तुळात खळबळ - Marathi News | Dr Babasaheb Ambedkar Tech University Scam 16 Lakh rupees Embezzlement Clerk Arrested | TV9 ...


नांदेड : राज्य सामायिक प्रवेश परीक्षेत (उएढ) हायटेक गैरप्रकार आणि गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणार्‍या या रॅकेटचा पोलीस व तपास यंत्रणांनी पर्दाफाश केला असून, या घोटाळ्यात थेट परीक्षा केंद्रांचे चालक, डमी उमेदवार आणि मध्यस्थांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करून संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू केला आहे. अशा प्रकारचे गैरप्रकार नांदेड येथील काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत झाले असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा समाज माध्यमावरून होत आहे. यामध्ये शहरातील नामांकित क्लासेसच्या संचालकाचा हात असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला हारताळ फासत पैशांच्या जोरावर संगणक प्रणालीत फेरफार करण्याचे हे षड्यंत्र रचले गेले होते. रिमोट क्सेस सॉफ्टवेअरच्या मदतीने कॉम्प्युटर स्क्रीन हॅक करून गुण वाढवणे आणि मूळ विद्यार्थ्यांऐवजी डमी उमेदवार बसवून परीक्षा उत्तीर्ण करून देण्याचे मोठे जाळे यामागे कार्यरत होते. परीक्षा केंद्रांवरील पर्यवेक्षक आणि सायबर तंत्रज्ञांच्या संगनमताने हा संपूर्ण प्रकार सुरू होता. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस यंत्रणेने धडक कारवाई करत परीक्षा केंद्रांवर छापे टाकले आणि संशयास्पद संगणक, हार्ड डिस्क व मोबाईल उपकरणांसह महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची तीव्रता पाहता, गैरव्यवहारात सहभागी असलेल्या काही संशयित टोळ्यांचे नेटवर्क केवळ एका शहरापुरते मर्यादित नसून संपूर्ण राज्यभरात पसरल्याचे पोलीस तपागात निष्पन्न झाले आहे. लाखां रुपयांच्या बोली लावून गुणवत्तेचा लिलाव मांडणार्‍या या मध्यस्थांवर आता कडक सायबर कायदे लावण्यात आले आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रवेश प्रक्रियेवरही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर पालक आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात असून, प्रशासनाने सर्व संबंधित परीक्षा केंद्रांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सीईटी सेलने परीक्षेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी तांत्रिक सुरक्षेत कडक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू असून, या घोटाळ्याचे धागेडोरे कुठे-कुठे पसरले आहेत आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल शोध घेतला जात आहे.
इंजिनिअरिंग एमएचटी-सीईटी निकालावर संशय;
निकालातील तफावत नीट (छएएढ) परीक्षेच्या वादानंतर आता राज्यभरातील इंजिनिअरिंग एमएचटी-सीईटी (चकढ-उएढ) परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि सीईटी सेलने जाहीर केलेल्या निकालावर विद्यार्थी व पालकांनी गंभीर संशय व्यक्त केला आहे. 12 वीचे गुण विरुद्ध सीईटी पर्सेंटाईल12 वीच्या राज्य मंडळ (कडउ) परीक्षेत अवघे 40 ते 50 टक्के गुण मिळालेल्या तब्बल 202 विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत 97 ते 100 पर्सेंटाईल मिळाल्याचे समोर आले आहे. या विसंगतीबाबत एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
रॅकेटचा संशय व शासनाकडे चौकशीची मागणी
12 वी बोर्डाची परीक्षा आणि सीईटीचा अभ्यासक्रम (झउच्) जवळपास सारखाच असतो, तर सीईटीची काठिण्यपातळी जेईई मेन्सच्या (गएए चरळप) समकक्ष असते. त्यामुळे 12 वीत कमी गुण असणार्‍या बहुतांश विद्यार्थ्यांना थेट 100 पर्सेंटाईल मिळणे हे शंकास्पद असून यामागे एखादे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणाची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS