आज १६ जुलै   आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

Homeलाईफस्टाईल

आज १६ जुलै आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

नमस्कार , मी सोमनाथ मान्ग्थ जंगम  जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र . मेष:- बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करू नका.

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आज १२ ऑगस्ट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.

नमस्कार , मी सोमनाथ मान्ग्थ जंगम  जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र .

मेष:-

बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करू नका. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. शुभ रंग गुलाबी  

शुभ अंक ६ 

वृषभ:-

दिवस आनंदात जाईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रत्येक गोष्टीचा उत्तम रसास्वाद घ्याल.  गायन कलेला वेळ द्यावा. शुभ रंग पिवळा    शुभ अंक ९ 

मिथुन:-

धाडसाने कामे हाती घ्याल. ठाम निर्णय घ्यावे लागतील. कामात द्विधावस्था आड येऊ देऊ नका. फसवणुकीपासून सावध राहा. अनावश्यक खर्चाला आळा घाला.शुभ रंग नारंगी  शुभ अंक ५ 

कर्क:-

 इतरांचे मन जपण्याचा प्रयत्न करावा. घरातील मोठ्या व्यक्तींचा पाठिंबा मिळेल. एखादी जुनी आकांक्षा पूर्ण होईल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. शुभ रंग हिरवा  शुभ अंक १ 

सिंह:-

प्रलंबित थकबाकी प्राप्त होईल. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल. मनातील निराशाजनक भाव काढून टाकावेत. लहान मुलांच्यात खेळावे. जेणेकरून मनावरील ताण कमी होईल. शुभ रंग निळा  शुभ अंक ८ 

कन्या:-

सकारात्मक उर्जेने काम करावे. जवळच्या व्यक्तीकडून मदत घेता येईल. अधिकारी वर्गाची गाठ घेता येईल. तुमच्या मनातील इच्छेला मुरड घालू नका. शुभ रंग लाल   शुभ अंक ७ 

तूळ:-

उजळ बाजू लक्षात घेऊन वागावे. कमी श्रमातून मिळणार्‍या फायद्याकडे तुमचा कल राहील. वारसाहक्काच्या कामातून लाभ संभवतो. काही कामे तुमची चिकाटी पणाला लावू शकतात.शुभ रंग पिवळा  शुभ अंक ३ 

वृश्चिक:-

जीवनसाथी बरोबर दिवस मजेत घालवाल. प्रेमाचा सुंदर आविष्कार पहायला मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल.  तुमच्या कामाचे श्रेय दुसर्‍या कोणाला घेऊ देऊ नका. शुभ रंग निळा  शुभ अंक ९ 

धनू:-

केलेल्या कामातून समाधान मिळेल. देवाण-घेवाणीच्या कामात सतर्क राहावे. कौटुंबिक वातावरण शांततेचे राखावे. काहीतरी नवीन करून घरच्यांना खुश कराल. शुभ रंग गुलाबी  शुभ अंक ४ 

मकर:-

कामाच्या व्यापामुळे त्रासून जाऊ नका.  जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. विचार करून साहस करावे. शुभ  रंग जांभळा  शुभ अंक  १ 

कुंभ:-

घरासाठी काही नवीन खरेदी केली जाईल. पैसे खर्च करताना मागचा-पुढचा विचार करावा. आरोग्यात हळूहळू सुधारणा दिसून येईल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. शुभ रंग पांढरा   शुभ अंक ७ 

मीन:-

 निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्याल. जवळच्या मित्र मंडळींमध्ये वेळ घालवाल. तुमच्या स्वभावातील गोडवा सर्वांच्या नजरेत येईल. दिवस मजेत जाईल. शुभ रंग पोपटी   शुभ अंक ३ 

COMMENTS