Homeताज्या बातम्या

देवळालीत हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा चौघांवर गुन्हा ; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा परिसरात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखा आणि राहुरी पोलिसांच्या संयु

जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; 11 लाखांचा मुद्देमाल जप्त
राशीनमध्ये हातभट्टीवर पोलिसांचा छापा७८० लिटर रसायन व दारू नष्ट
खरातच्या पत्नीने आर्थिक व्यवहाराशी संबंध नाकारलेराहाता न्यायालयात जामिनासाठी सुनावणीवेळी युक्तीवाद


देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा परिसरात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू निर्मितीच्या अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखा आणि राहुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारी पहाटे छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत ५७ हजार ८६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन संशयित फरार आहेत.
टाकळीमिया रस्त्यावरील छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाजवळ घराच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्रीसाठी साठवून ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी पहाटे छापा टाकण्यात आला.
या प्रकरणात गणेश रमेश गायकवाड (रा. देवळाली प्रवरा), राजेंद्र धोंडीराम उंडे (रा. देवळाली प्रवरा) तसेच दारू निर्मितीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून देणारे रामचंद्र विठ्ठल काळे (रा. राहुरी फॅक्टरी) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर रविंद्र दिगंबर डुकरे आणि बापू भास्कर गायकवाड हे दोघे घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी १२७ लिटर तयार गावठी हातभट्टी दारू, २६५ लिटर कच्चे रसायन, दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे यंत्र, गुळाच्या १३ गोण्या, नवसागर सदृश पदार्थ, पांढरी तुरटी, हिरडा पूड तसेच अन्य साहित्य जप्त केले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५७ हजार ८६५ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान आरोपी विविध पदार्थांचे मिश्रण करून मानवी आरोग्यास अपायकारक आणि विषारी स्वरूपाची दारू तयार करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा दारूचे सेवन केल्यास गंभीर शारीरिक परिणाम होण्याबरोबरच जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची माहिती असूनही आर्थिक लाभासाठी तिची विक्री केली जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस शिपाई भगवान थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS