Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

सुभेदार बबन शिंदेंवर शासकीय इतमामात अंत्संसंस्कारपाथर्डीतील सुपुत्राचे अमृतसर येथे निधन

पाथर्डी : तालुक्यातील दगडवाडी येथील सैन्यदलात भरती झालेल्या बबन दत्तात्रय शिंदे (वय ४६ ) यांचे अमृतसर (पंजाब) येथे ड्युटीवर असतानाच हृदयविकार

विकासकामांमध्ये राजकारण नव्हे जनहिताला प्राधान्यआ. रोहित पवार ; बसस्थानक, जिल्हा उपरुग्णालय, व्यापारी संकुलासह विविध कामांचा आढावा
मच्छिंद्र चाकणे यांचा सत्कार
शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा आज रास्तारोको

पाथर्डी : तालुक्यातील दगडवाडी येथील सैन्यदलात भरती झालेल्या बबन दत्तात्रय शिंदे (वय ४६ ) यांचे अमृतसर (पंजाब) येथे ड्युटीवर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बुधवारी त्यांचा पार्थिव देह दगडवाडी येथे आल्या नंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्संसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा समुदाय उपस्थित होता.सुभेदार बबन शिंदे यांचे पार्थिव विशेष विमानाने अमृतसर येथून पुणे येथे व पुणे येथून अहिल्यानगर मार्गे दगडवाडी येथे आणण्यात आले. सैन्याच्या सजवलेल्या रथामध्ये त्यांचे पार्थिव ठेवण्यात आला होता. दगडवाडी येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर शासकीय इतनामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने व मॅकेनाईज्ड इनफन्ट्री या सैन्यात दलाच्या विभागातील जवानांनी हवेत फायर करत त्यांना मानवंदना दिली तर शासनाच्या वतीने तहसीलदार डॉ.उद्धव नाईक यांनी पुष्पचक्र अर्पण केले. बबन शिंदे हे २००१ साली सैन्य दलात भरती झाले होते.त्यांनी सुभेदार या पदापर्यंत सेवा केली.नुकतीच त्यांना चार महिन्यांनी आणखी बढती मिळणार होती.मात्र त्यापूर्वीच मंगळवारी शासकीय पिटी करून ते घरी आले असता अचानक त्यांना छातीत दुखू लागले व त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी कॅप्टन रंगनाथन, कॅप्टन राघवन, कॅप्टन आर के ढाका, सुभेदार बलवंत सिंग ,कॅप्टन अभिमन्यू तसेच त्रिदल या माजी सैनिकांची संघटना यांसह अक्षय कर्डिले ,ज्ञानेश्वर महाराज, कराळे व सरपंच सुभाष शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी करंजी, दगडवाडी , भोसे, बाभुळगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सुभेदार बबन शिंदे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

COMMENTS