Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खेळ आणि संवादातून विद्यार्थ्यांना लिंग समभावाचे धडे; राज्य सरकारच्या सहाय्याने अंगाई आणि युनिसेफचा उपक्रम

मुंबई : लिंग भेद दूर करण्याबाबत राज्य शासनाच्या सहाय्याने अंगाई आणि युनिसेफतर्फे लिंग समभाव या विषयावर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना प्रबोधनप

शेवगाव तालुक्याच्या गोळेगाव महिला सक्षमीकरणासाठी बैठक
शिरसाटवाडीतील विकास कामांची शासकीय समितीकडून पाहणी
गाडेवाडीत अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ; मुलांची गैरसोय थांबणार

मुंबई : लिंग भेद दूर करण्याबाबत राज्य शासनाच्या सहाय्याने अंगाई आणि युनिसेफतर्फे लिंग समभाव या विषयावर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना प्रबोधनपर प्रशिक्षण दिले जात आहे. युनिसेफ आणि अंगाई यांच्या सहकार्याने देशात पहिल्यांदा धाराशीव जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या लिंग समभाव शिक्षण उपक्रमामुळे ग्रामीण मुलींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येत आहे. खेळाधारित शिक्षण, संवाद आणि सहभागात्मक उपक्रमांच्या माध्यमातून किशोरवयीन मुला-मुलींमध्ये समानतेची जाणीव निर्माण होत आहे.
हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणार्‍या शिक्षण आणि प्रशिक्षणाची जिल्हा संस्था डाएटच्या (डीआयईटी) सहकार्याने राबवण्यात आला. संपूर्ण भारतामध्ये केवळ धाराशिव जिल्ह्यात हा प्रकल्प राबवला असून त्यामध्ये 120 शाळा, 800हून अधिक शिक्षक आणि 18,000 हून अधिक मुलांचा सहभाग होता. धाराशिवमध्ये प्रायोगिकतत्वावर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील धाराशिवमध्ये, अंगाई-युनिसेफतर्फे लिंग समभाव हा विषय खेळाधारित शिक्षणाद्वारे किशोरवयीन मुले-मुली, शिक्षक आणि गावातील समुदायांना शिकवण्यात आला. मीना राजू मंच हा इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आला असून लिंग समभावाशी संबंधित विविध पैलूंची माहिती त्यांना करून देण्यात आली.

COMMENTS