Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भंडारदरा परिसरातील गावांना धरणाचे पाणी सर्वेक्षणास मंजुरी ; आठवड्यात प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश

अकोले : तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या मागील बाजूच्या तसेच धरण भिंतीच्या पूर्वेकडील परिसरातील सर्व आदिवासी गावांना शासकीय योजनेतून पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वेक्षणास मंजुरी देण्यात आली असून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे. लाँग मार्चमध्ये मान्य करण्यात आलेल्या मागण्यांच्या आढाव्यासाठी अकोले तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व सीआयटीयूच्या विविध संघटनांच्या वतीने आयोजित या बैठकीत जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. प्रांताधिकारी मुंडे व तहसीलदार मोरे यांच्या उपस्थितीत विविध विभागांचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. लाँग मार्चदरम्यान भंडारदरा परिसरातील आदिवासींना धरणाचे पाणी देण्याची मागणी मान्य करण्यात आली होती. मंत्रालय स्तरावर यासंदर्भात आदेशही देण्यात आले होते. त्यानुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वेक्षणास प्रारंभ करण्याचे निर्देश दिल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी कोळेकर यांनी दिली. जलसंपदा विभागाकडून आवश्यक आदेश प्राप्त झाले असून प्राथमिक सर्वेक्षण पुढील आठवड्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भंडारदरा धरणाला शंभर वर्षे पूर्ण होत असताना स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना पिण्यास व शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. बैठकीत भंडारदरा प्रकल्पामुळे जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यात देण्यात आलेल्या जमिनी वर्ग दोन ऐवजी वर्ग एक करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. तसेच अकोले तालुक्यातील घरांच्या तळजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासंदर्भातील प्रकरणांवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. २०११ पूर्वीच्या तळजमिनींची नोंद संबंधितांच्या नावे करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले. वनहक्कांतर्गत कसत असलेल्या जमिनींच्या पडताळणीसाठी किसान सभेने सादर केलेल्या ९४८ प्रकरणांची तपासणी तातडीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय आशा कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक व बांधकाम कामगारांच्या प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या रतनवाडी व खडकी बुद्रुक येथील योजनांबाबत गंभीर तक्रारी मांडण्यात आल्या. तसेच आंबेवंगण येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. बैठकीस डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, गणेश ताजने, तुळशीराम कातोरे, हेमलता शेळके, संगीता साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अकोले तालुका माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी मुंदडा, मंत्रीपदी राठी
अकोले बाजार समितीत कांद्याला तेराशे रुपयांचा भाव
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा; अकोले दिव्यांग क्रांती संघटनेची मागणी

अकोले : तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या मागील बाजूच्या तसेच धरण भिंतीच्या पूर्वेकडील परिसरातील सर्व आदिवासी गावांना शासकीय योजनेतून पाणीपुरवठा करण्यासाठी सर्वेक्षणास मंजुरी देण्यात आली असून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे. लाँग मार्चमध्ये मान्य करण्यात आलेल्या मागण्यांच्या आढाव्यासाठी अकोले तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व सीआयटीयूच्या विविध संघटनांच्या वतीने आयोजित या बैठकीत जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. प्रांताधिकारी मुंडे व तहसीलदार मोरे यांच्या उपस्थितीत विविध विभागांचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

लाँग मार्चदरम्यान भंडारदरा परिसरातील आदिवासींना धरणाचे पाणी देण्याची मागणी मान्य करण्यात आली होती. मंत्रालय स्तरावर यासंदर्भात आदेशही देण्यात आले होते. त्यानुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वेक्षणास प्रारंभ करण्याचे निर्देश दिल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी कोळेकर यांनी दिली. जलसंपदा विभागाकडून आवश्यक आदेश प्राप्त झाले असून प्राथमिक सर्वेक्षण पुढील आठवड्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भंडारदरा धरणाला शंभर वर्षे पूर्ण होत असताना स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना पिण्यास व शेतीसाठी पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

बैठकीत भंडारदरा प्रकल्पामुळे जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यात देण्यात आलेल्या जमिनी वर्ग दोन ऐवजी वर्ग एक करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. तसेच अकोले तालुक्यातील घरांच्या तळजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासंदर्भातील प्रकरणांवर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. २०११ पूर्वीच्या तळजमिनींची नोंद संबंधितांच्या नावे करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

वनहक्कांतर्गत कसत असलेल्या जमिनींच्या पडताळणीसाठी किसान सभेने सादर केलेल्या ९४८ प्रकरणांची तपासणी तातडीने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. याशिवाय आशा कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक व बांधकाम कामगारांच्या प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या रतनवाडी व खडकी बुद्रुक येथील योजनांबाबत गंभीर तक्रारी मांडण्यात आल्या. तसेच आंबेवंगण येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

बैठकीस डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, गणेश ताजने, तुळशीराम कातोरे, हेमलता शेळके, संगीता साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS