Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

अमेरिका-इराण चर्चेला पुन्हा खीळ; अधिकार्‍यांनी पाकिस्तान दौरा केला रद्द

तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यात प्रस्तावित असलेल्या युद्धविराम चर्चेला पुन्हा एकदा खी

फिफा विश्‍वचषक स्पर्धेत स्पेन ठरला विश्‍वविजेता11 वर्षांनी कोरले जेतेपदावर नाव ; स्पर्धेत आठही सामन्यात स्पेन राहिला अपराजित
इराणमधील भारतीयांना प्रवास टाळण्याचे आवाहन
पाकिस्तानात पेट्रोल 458, डिझेल 520 रुपयांच्या पुढे
US, Pakistan, Iran holding trilateral face-to-face talks in Islamabad:  White House

तेहरान/वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यात प्रस्तावित असलेल्या युद्धविराम चर्चेला पुन्हा एकदा खीळ बसली आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ प्रतिनिधींचा पाकिस्तान दौरा अचानक रद्द करण्यात आल्याने ही प्रक्रिया ठप्प झाली असून, दोन्ही देशांमधील संवाद आणखी अनिश्‍चिततेत गेला आहे.
अमेरिकेच्या विशेष दूतांसह उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ इस्लामाबादमध्ये इराणशी अप्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी जाणार होते. मात्र, अखेरच्या क्षणी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या घडामोडींमुळे दोन्ही देशांदरम्यान संवाद सुरू करण्याचा दुसरा प्रयत्नही निष्फळ ठरला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर याबाबत भूमिका मांडताना, फक्त औपचारिक किंवा निष्फळ चर्चांसाठी प्रदीर्घ प्रवास करण्याचा काही अर्थ नाही, असे स्पष्ट केले. जर इराणला खरोखरच संवाद साधायचा असेल, तर त्यांनी थेट संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले. त्याचवेळी, या निर्णयाचा अर्थ अमेरिका इराणविरोधात आक्रमक भूमिका घेणार आहे, असा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS