Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाडेवाडीत अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ; मुलांची गैरसोय थांबणार

गेवराई : गेवराई तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या गाडेवाडी येथे नवीन अंगणवाडी बांधकामाचा शुभारंभ विद्यमान सरपंच राजेंद्र कदम यांच्

कवडगाव (खेडकर वस्ती) येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात  प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
गेवराईत दहा दिवसीय डान्स व ॲक्टिंग शिबिराचे भव्य आयोजन
बीडमध्ये ऊसतोड कामगाराचे अपहरण

गेवराई : गेवराई तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या गाडेवाडी येथे नवीन अंगणवाडी बांधकामाचा शुभारंभ विद्यमान सरपंच राजेंद्र कदम यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
गाडेवाडी येथे अनेक वर्षांपासून अंगणवाडीची स्वतंत्र इमारत नसल्यामुळे लहान मुलांना गावातील बनगर यांच्या घरात बसून शिक्षण घ्यावे लागत होते. या गैरसोयीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत नवीन अंगणवाडी इमारतीस मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी नवीन अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ विद्यमान सरपंच राजेंद्र कदम यांच्या शुभहस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी युवा कार्यकर्ते सुदाम लोंढे, माजी उपसरपंच अंबादास गाडे, अशोक करांडे, ग्रामपंचायत सदस्य बाळू पाटील, महादेव गाडे, नारायण गाडे, सुभाष वावरे, श्रीराम वावरे, सातीराम महारगुडे, रमेश गाडे, गणपत वावरे, लाला वावरे, संभाजी गाडे, अशोक गाडे, नवनाथ वावरे, सचिन लवटे, मच्छिंद्र मोरे, भरत गाडे आदींसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. नवीन अंगणवाडी इमारतीमुळे गावातील लहान मुलांना सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज वातावरणात शिक्षण घेता येणार असून, त्यांच्या होत असलेल्या गैरसोयीला आता कायमचा पूर्णविराम मिळणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात असून, ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS