बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नुकतीच बदली होऊन त्यांची नांदेड येथे सहआयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्या

बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नुकतीच बदली होऊन त्यांची नांदेड येथे सहआयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा भाजपचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर, नगरसेविका डॉ. सारिकाताई क्षीरसागर तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
यावेळी फडसे यांच्या बीड नगरपरिषदेतील कार्यकाळाचा गौरव करण्यात आला. नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केल्याचे उपस्थितांनी नमूद केले. कर्मचार्यांच्या समस्या समजून घेत त्या शासनस्तरावर मांडणे, विकासकामांना गती देणे, प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे तसेच रखडलेल्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. प्रशासकीय जबाबदारी पार पाडताना शैलेश फडसे यांनी पारदर्शकता, शिस्त आणि जनहिताला प्राधान्य दिले. नियमबद्ध व लोकाभिमुख प्रशासन देण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांमध्येही त्यांच्या कार्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणार्या अधिकार्यांची समाजाला नेहमीच गरज असते. बीडमध्ये त्यांनी केलेल्या कार्याप्रमाणेच नांदेड येथील नव्या जबाबदारीतही ते लोकसेवेची परंपरा कायम ठेवतील, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. या सत्कार समारंभास भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा यांच्यासह नगरपरिषदेतील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS