Homeताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसचा रस्ता रोको; महामार्गावर ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, खासदार कल्याण काळे पोलिसांच्या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार, १५ जून २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कमालीची आक्रमक झालेली पाहायला मिळाल

विहीर खचून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू
मराठा आरक्षणावर समाधानकारक काम सुरू; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा
निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे माजी नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर गुन्हा दाखल
Agriculture Crisis: शेतकरी प्रश्नी काँग्रेस आक्रमक, छत्रपती संभाजीनगरमध्ये  रास्तारोको, ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा | Congress Holds Rasta Roko  Protest Over Farmers ...

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवार, १५ जून २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस कमालीची आक्रमक झालेली पाहायला मिळाली. काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी संभाजीनगर-जालना महामार्गावरील प्रसिद्ध केंब्रिज चौकात जोरदार ‘रस्ता रोको’ आंदोलन केले.

काँग्रेसच्या या अचानक झालेल्या आक्रमक आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलनाची तीव्रता एवढी मोठी होती की, बघता बघता महामार्गावर तब्बल ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. शेवटी, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलक खासदार कल्याण काळे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.

COMMENTS