शिर्डी : क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील मैलाचा दगड ठरणाऱ्या, डॉ. दत्ता विघावे लिखित ‘वादाच्या दुनियेतील पंचगिरी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते पार पडला. क्रिकेटच्या मैदानात पंचांच्या चुंकांमुळे उद्भवलेल्या वादांवर आधारित घटनांचे विश्लेषण करणारा हा ग्रंथ साहित्यविश्वात नवी भर घालणारा ठरला असून, या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.या भव्य प्रकाशन सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ नेते दत्ताजी डोंगरे, विठ्ठलराव सोनवणे, संजय राऊत आणि डॉ. अरविंद बडाख यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्तींची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी पुस्तकातील विषयांवर सविस्तर चर्चा केली, तसेच डॉ. विघावे यांच्या लेखनाच्या प्रदीर्घ प्रवासाचे कौतुक केले.डॉ. दत्ता विघावे यांनी केवळ लेखणीद्वारेच नव्हे, तर प्रत्यक्ष मैदानात पंच म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. स्वतःच्या मुलासह ३२ सलग क्रिकेट सामन्यांत पंचगिरी करून विश्वविक्रम प्रस्थापित करणारे डॉ. विघावे यांचा क्रीडा क्षेत्रातील अनुभव या पुस्तकातून वाचकांना अनुभवायला मिळणार आहे. १९८८ पासून क्रिडा पत्रकारितेत कार्यरत असलेल्या डॉ. विघावे यांनी १३,००० पेक्षा जास्त लेख लिहून क्रिकेट समिक्षणात आपले स्थान निर्माण केले आहे. ‘वादाच्या दुनियेतील पंचगिरी’ हे पुस्तक पंचांच्या आव्हानात्मक आणि ‘ कठिण’ कार्यावर प्रकाश टाकणारे असल्याने, क्रीडाप्रेमींसाठी हे एक उत्तम वाचन व संग्रही ठरणार आहे.

COMMENTS