बीड : बीड शहरातील शाहूनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत लावत आरोप

बीड : बीड शहरातील शाहूनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत लावत आरोपीला अटक केली. विशेष म्हणजे चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून, या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माहितीनुसार, सतिराम तुकाराम ढोले या बांधकाम कंत्राटदाराचे शाहूनगर भागात बांधकाम सुरू आहे. २९ मे २०२६ रोजी रात्री अज्ञात चोरट्याने तेथील बंद खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि खोलीत ठेवलेली बॉश कंपनीची कट-ऑफ मशीन व इलेक्ट्रिक मशीन असा एकूण १६ हजार रुपये किमतीचा माल चोरून नेला. याप्रकरणी ढोले यांनी तक्रार दाखल केल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५ व ३३१(४) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकट राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपी शेख शाहिंशाह शेख बशीर (रा. इस्लामपुरा, बीड) याला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही उल्लेखनीय कारवाई विकास रेवाळे, रवींद्र आघाव, ज्ञानेश्वर मराडे, अनिल घटमळ, बाळू रहाडे, दिलीप राठोड आणि आबेद पठाण यांच्या पथकाने केली.

COMMENTS