Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दररोज सहा हजार बस प्रवाशांकडून युपीआयद्वारे तिकीट खरेदी

मुंबई : एसटी महामंडळाच्या बसमध्ये तिकीट काढताना प्रवाशांचा अनेक वेळा वाहकसोबत वाद होतो. सुट्टया पैशांवरून वाद होवू नयेत, यासाठी एसटी महामंडळाने ड

नागपूर-शिर्डी पहिल्या बसचे श्री साई संस्थानने केले स्वागत
अहमदनगर : केडगावमध्ये ११ लाखांची सुगंधी सुपारी जप्त
फेसबुक live वर घेतली गळफास

मुंबई : एसटी महामंडळाच्या बसमध्ये तिकीट काढताना प्रवाशांचा अनेक वेळा वाहकसोबत वाद होतो. सुट्टया पैशांवरून वाद होवू नयेत, यासाठी एसटी महामंडळाने डिसेंबर 2023 मध्ये डिजिटल पेमेंटला सुरुवात केली. या सुविधेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून दिवसाला 5 ते 6 हजार प्रवासी यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढत आहेत.
यामुळे दरमहा 4 ते 5 कोटी रुपये महसूल नव्या डिजिटल यूपीआय पेमेंटद्वारे थेट एसटीच्या बँक खात्यात जमा होत आहे. तसेच वाहकाचे सुट्टे पैसे सांभाळण्याचे कामही हलके होत आहे. सर्वत्र डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे बहुसंख्य प्रवासी रोख व्यवहार करण्याऐवजी ऑनलाइन व्यवहार करणे पसंत करतात. एसटी महामंडळानेही डिजिटल व्यवहाराचा पर्याय प्रवाशांना उपलब्ध केला आहे. प्रवाशांना बसमध्ये तिकिट काढण्यासाठी फोन पे, गूगल पे यांसारखी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वाहकाकडील ड्राईड तिकीट यंत्रावरील क्युआर कोडद्वारे प्रवाशांना तिकीटाचे पैसे डिजिटल स्वरूपात देणे शक्य होत आहे. या सुविधेमुळे प्रवाशांचा सुट्या पैशांवरून वाहकासोबत होणारा वाद संपुष्टात येऊ लागला आहे, असे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. एसटीतून दररोज 50 ते 55 लाख प्रवासी प्रवास करतात. या तुलनेत यूपीआय पेमेंटद्वारे तिकीट काढणार्‍या प्रवाशांची संख्या कमी आहे. सध्या एसटी महामंडळातील सुमारे 34 हजार वाहकांकडे ड्रॉईड इलेक्ट्रिक तिकीट यंत्र आहे. बहुतेक वाहकांना हे मशीन जलदगतीने व्यवस्थित हाताळता येत नाही. त्यामुळे वाहक प्रवाशांकडे रोख रकमेने तिकीट काढण्याचा आग्रह धरतात. तसेच यूपीआय पेमेंटबाबत प्रवाशांमध्ये प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे. तसेच वाहकांना ड्रॉईड इलेक्ट्रिक तिकीट यंत्र चालवण्याबाबत प्रशिक्षित करणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांकडून केली आहे.

COMMENTS