संघर्ष, सेवा आणि समर्पणाचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार्या डॉ. नामदेव पंडित यांच्या वास्तव जीवनावर आधारित ‘परिसस्पर्श’ या ग्रंथाचे भव्य प्रकाशन सो

संघर्ष, सेवा आणि समर्पणाचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार्या डॉ. नामदेव पंडित यांच्या वास्तव जीवनावर आधारित ‘परिसस्पर्श’ या ग्रंथाचे भव्य प्रकाशन सोहळा नुकताच अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडला. युवा लेखक डॉ. राजेश दिवटे यांनी लिहिलेल्या या ग्रंथातून एका ध्येयवेड्या व्यक्तिमत्वाचा जीवनप्रवास समाजासमोर प्रभावीपणे सादर करण्यात आला आहे.
हा सोहळा आनंद रोडवरील राष्ट्रीय पाठशाळा एन. एम. एस. फार्मसी कॉलेज येथे संपन्न झाला. कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रमुख डॉ. जयपाल दगडे पाटील यांनी ग्रंथाचे कौतुक करताना सांगितले की, डॉ. राजेश दिवटे यांनी डॉ. पंडित यांचे प्रेरणादायी कार्य ‘परिसस्पर्श’च्या माध्यमातून समाजासमोर आणले आहे, हे अत्यंत मोलाचे कार्य आहे. आजच्या धावपळीच्या युगात दिशा शोधणार्या तरुण पिढीसाठी हा जीवनप्रवास निश्चितच मार्गदर्शक ठरेल. या ग्रंथाचा सकारात्मक स्पर्श प्रत्येकाच्या आयुष्याला नवी उभारी देईल. मान्यवरांची उपस्थिती या प्रकाशन सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली, त्यामध्ये डॉ. संतोष सुरवसे (अहिल्यानगर गो संसद) डॉ. राहुल नामदेव पंडित (पंडित हॉस्पिटल) बाबुराव दळवी (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते) राणीताई पंडित (राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या आरोग्य सेविका) सौ. राधा राजेश दिवटे (संचालिका, विजेता करिअर अकॅडमी) यांचा समावेश होता. लेखक डॉ. राजेश दिवटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. नामदेव पंडित यांचा जीवनप्रवास केवळ एका व्यक्तीचा नसून तो समाजासाठी आदर्श आहे. त्यांच्या जीवनातील वास्तववादी प्रसंग, संघर्ष आणि समाजसेवेतील योगदान हे नव्या पिढीसाठी प्रेरणास्रोत आहे. हा ग्रंथ अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावा, हाच लेखनामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास अहिल्यानगर परिसरातील नागरिक, वाचक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमानंतर ‘परिसस्पर्श’ ग्रंथाचे सर्वत्र कौतुक होत असून डॉ. राजेश दिवटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS