Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्ता संघर्षाचा निकाल या आठवड्यात येणार ?

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्ता-संघर्षाचा निकाल या आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीची रण

एकनाथ शिंदेच्या अडचणी वाढल्या
तगड्या रेंजसह स्कोडाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार लवकरच लॉन्च.
पाणी प्रश्‍न सुटण्यासाठी व्यापक लढा उभारणार ः कोल्हे

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्ता-संघर्षाचा निकाल या आठवड्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना, या आठवड्यात महाराष्ट्राचा सत्ता-संघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारचा विश्‍वासदर्शक ठराव आणि विधानसभा अध्यक्ष निवडीची वैधता या तीन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठ काय निकाल देणार, याची उत्सुकता आहे. एकीकडे शिंदे गट आणि भाजपने सरकार वाचावे म्हणून देव पाण्यात ठेवलेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतले राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे गटाने निकाल आपल्या बाजूनेच लागेल असा दावा करताहेत. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरू आहेत. त्यात स्वतः सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड, यांच्यासह न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यामूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे. यातल्या न्यायमूर्ती एम. आर. शहा हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे तत्पूर्वी हा निकाल येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे, 20 मे पासून सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्याही सुरू होत आहेत. 20 मे ते 2 जुलै अशी सुप्रीम कोर्टाची सुट्टी असणार आहे. त्यामुळे या आठवड्यात कधीही निकालाची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. तब्बल 40 आमदार फोडले. मात्र, राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टातील तरतूद सांगते की, दोन तृतीयांशहून अधिक आमदारांचा गट फुटल्यास त्यांना दुसर्‍या पक्षात विलीन व्हावे लागते. मात्र, शिंदे यांचा गट कुठल्याही पक्षात विलीन तर झालाच नाही, पण त्यांनीच शिवसेनेवर दावा ठोकला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. मात्र, आता सर्वोच्च न्यायालय काय करणार, हे पाहावे लागेल.

COMMENTS