Homeताज्या बातम्या

भाडेवाढीविरोधात व्यापाऱ्यांचे देवळाली प्रवरा नगरपालिकेस निवेदन

देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा बाजारतळावरील व्यापाऱ्यांनी भाडेवाढीविरोधात नगरपालिकेकडे निवेदन देत वाढीव भाडे रद्द करण्याची मागणी केली आहे. बाजारतळावरील व्यापाऱ्यांना वाढीव भाड्याच्या नोटिसा मिळाल्यानंतर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळूंज, अशोक गाडेकर, शौकत तांबोळी, सागर सोनवणे, अरुण हुडे, किशोर कदम, मन्सूर बागवान, गणेश लासुरकर, मन्सूर शेख, सलीम शेख, विलास मुसमाडे, बाबाजान शेख, आण्णासाहेब कदम, कुंडलिक हुडे, अविनाश हुडे, मच्छिंद्र कोळसे, नारायण कडू व जयेश भालेकर यांनी नगराध्यक्ष सत्यजित कदम व मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांना निवेदन दिले.व्यापाऱ्यांनी अचानक करण्यात आलेली भाडेवाढ अन्यायकारक असल्याचे सांगत ती टप्प्याटप्प्याने करावी, अशी मागणी केली. यावर नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी व्यापाऱ्यांचे हित जपून सर्वसाधारण सभेत विषय मांडून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा आज रास्तारोको
जनगणनेच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह?नागरिकांकडून माहिती लपविण्याचे प्रकार, प्रगणकांवर दबाव असल्याची चर्चा
चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकच ‘गस्ती’वर ‘अलर्ट सिस्टीम’मुळे सुरक्षा वाढली;प्रवरा पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ

COMMENTS