Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नृत्य-गीतांतून बाबासाहेबांना अभिवादनजयभीम महोत्सवातून सामाजिक जागृतीचा संदेश

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी उत्साहात साजरा होणारा जयभीम महोत्सव हा समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत

भारताचा पाया माझा भीमराया-प्रा.जगदिश ओहोळ
बीड जि.प.मध्ये महापुरुषांचे 12 फुटी पूर्णाकृती पुतळे उभारावेत – पप्पू कागदेफुले-शाहू-आंबेडकरांच्या पुतळ्यांची उंची वाढवावी; रिपाइंचा ठाम आग्रह
आंबेडकरांनी उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हक्क व अधिकार मिळवून दिले-किसन तांगडे



महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी उत्साहात साजरा होणारा जयभीम महोत्सव हा समाजासाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे मत झी 24 तास वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळ यांनी व्यक्त केले.
बीड शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्ताने जयभीम महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रविवारी (दि.12) रोजी जयभीम महोत्सवाच्या निमित्ताने भव्य नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अध्यक्ष स्थानावरुन महेंद्र मुधोळकर बोलत होते. यावेळी उदघाटक म्हणून लावणी प्रिन्स शुभम बोराडे, रवी वाघमारे, सुशिलाताई मोराळे आदी उपस्थित होते.भव्य नृत्य स्पर्धेचे प्रमुख अजय सवाई यांच्या नियोजनातून स्पर्धा पार पडली. महेंद्र मुधोळकर पुढे बोलताना म्हणाले जयभीम महोत्सवातले सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी ठरत असून, महापुरुषांच्या विचारधारेवर आधारित गीतांद्वारे कवी व गायकांनी सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश दिला. तसेच या गीतांवर विविध वयोगटातील कलाकारांनी सादर केलेल्या नृत्यांनी प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला, असे त्यांनी नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गोडी आणि त्यांचे कार्य समजून घेण्यासाठी अशा कार्यक्रमांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. जयंतीपुरते मर्यादित न राहता वर्षभर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे, विचारांना चालना देणारे आणि सामाजिक भान निर्माण करणारे दर्जेदार उपक्रम आयोजित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा उपक्रमांमुळे नवीन पिढीला बाबासाहेबांचे विचार अधिक प्रभावीपणे समजतील व ते आचरणात आणण्याची प्रेरणा मिळेल.समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जपणूक होण्यासाठी या उपक्रमांचे महत्त्व असल्याचेही महेंद्र मुधोळकर यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे प्रमुख अजय सवाई यांनी केले. सूत्रसंचालन यश सवाई यांनी तर आभार पियुष सवाई यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीने मोलाचे योगदान दिले.

COMMENTS