Homeताज्या बातम्या

अभिजित दीपके यांच्याविरोधात उपोषण करणाऱ्यांची प्रकृती खालावली

छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या

विशेष सखोल पुनर्निरक्षण मोहिमेत नांदेड दक्षिणची 99 टक्के प्रगती
नांदेड शहरातील बाफनाबाफना पुलाखाली दिवसाढवळ्या खंजीराचा धाक दाखवत युवकाला लुटले; परिसरात गुन्हेगारांचा वाढता वावर चिंतेचा विषय
श्री दत्त संस्थान, बालाघाट येथे गुरुपौर्णिमा उत्सव सोहळ्याचे आयोजन; विविध धार्मिक कार्यक्रमांची भक्तिमय मेजवानी
अभिजीत दीपके यांच्या विरोधात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या चार  दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करणाऱ्या मनीष ब्रह्माभट आणि राहुल ...

छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाची तीव्रता वाढली आहे. गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग करून आंदोलन करणारे मनीष ब्रह्मभट्ट आणि राहुल पांड्या यांची प्रकृती खालावल्याने पोलिसांनी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतरही आंदोलन मागे घेण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे. पोलिसांनी बळजबरीने रुग्णालयात आणल्याचा आरोप करत, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार मनीष ब्रह्मभट्ट यांनी व्यक्त केला. अभिजित दीपके यांच्याविरोधात विविध मागण्यांसाठी ब्रह्मभट्ट आणि पांड्या यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. सलग चार दिवस अन्नत्याग केल्याने त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. प्रकृती अधिक खालावल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी दोघांना रुग्णालयात हलवले. रुग्णालयातून भूमिका स्पष्ट करताना ब्रह्मभट्ट यांनी आंदोलन थांबवणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे आता प्रशासन आणि आंदोलक यांच्यातील पुढील भूमिका काय राहणार, याकडे लक्ष लागले आहे.

COMMENTS