Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी बँकांनी सीएसआर मधून निधी उपलब्ध करून द्यावा

नाशिक -  नाशिक जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबविली जात असून या योजनेच्या अमंलबजावणीसाठी  संस्थांचे योगदान व लोकसह

महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये
अंमली पदार्थ माफिया ललित पाटीलला पोलिसांनी केली अटक
आता आपल्या श्‍वासाची तरी कुणी द्यावी हमी…

नाशिक –  नाशिक जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबविली जात असून या योजनेच्या अमंलबजावणीसाठी  संस्थांचे योगदान व लोकसहभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील बँकांनी सीएसआर मधून या योजनेच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, नंदकुमार साखला, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, बँक प्रतिनिधी, एम.आय.डी. सी चे प्रतिनिधी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी  उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यावेळी म्हणाले की, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेच्या जिल्हात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांसाठी निधीची आवश्यकता आहे. बँकासोबतच एम.आय.डी.सी मधील सर्व आस्थापना व जिल्हा उद्योग केंद्रामार्फतही एम.आय.डी.सी. वगळता इतर आस्थापनांना येणाऱ्या काळात सीएसआर मधून निधी उपलब्ध करून देणेबाबत सूचित करण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकारी यांना दिल्या.

जिल्ह्यातील धरणांमधून मृद व जलसंधारण विभागामार्फत 70 हजार 671 घनमीटर गाळ काढला असून लोकसहभागातून 30 हजार 206 घनमीटर गाळ काढला गेला आहे. 30 हजार 206 घनमीटर गाळ शेतकऱ्यांनी वैयक्तिक स्वखर्चाने वाहून नेला असून शासकीय योजना धरणाची घळभरणी कमाकरिता 1 लक्ष 5000 घनमीटर गाळ वापरला गेला आहे. एकुण जवळपास २ लाख १६ हजार ४७७ घनमीटर आज पर्यत गाळ काढण्यात आला असुन यामुळे धरणामध्ये २१ कोटी लिटर अधिक पाणी साठा निर्माण होणार आहे असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकरी हरिभाऊ गिते यांनी विषद केली.

COMMENTS