ओवेसी यांच्याकडे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचं अंगवस्त्र म्हणूनच पहिले जाईल…

Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

ओवेसी यांच्याकडे भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाचं अंगवस्त्र म्हणूनच पहिले जाईल…

प्रतिनिधी : मुंबई देशाच्या राजकारणात मुस्लिम समाजाला डावलता येणार नाही. मुस्लिमांनी राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय त्यांना त्यांचे हक्

देवेंद्र फडणवीसांनंतर आता या भाजप मंत्र्यांनी दिला ‘मी पुन्हा येईन’ चा नारा
इस्लामपूर भाजपा कार्यालयावर उच्च न्यायालयाचा हातोडा
९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही… भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे…

प्रतिनिधी : मुंबई

देशाच्या राजकारणात मुस्लिम समाजाला डावलता येणार नाही. मुस्लिमांनी राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय त्यांना त्यांचे हक्क, प्रतिष्ठा मिळणार नाही, हे सांगण्याचे धाडस ओवेसी यांच्यासारखे नेते दाखविणार नसतील तर मतविभागणी करून आपल्या सुपारीबाज मायबापांना मदत करणाऱ्यांपैकी एक असेच ओवेसींचे नेतृत्व राहील. 

तिहेरी तलाकवर कायद्याने बंदी आणून सरकारने चांगले काम केले व लाखो मुसलमान महिलांची गुलामीच्या जोखडातून सुटका केली. पण ज्या धर्मांध पुढाऱ्यांनी, मुल्ला-मौलवींनी या कायद्यास विरोध केला, त्यांच्या पाठीशी ओवेसी उभे राहिले. त्यामुळे मुसलमानांच्या कोणत्या हक्क व अधिकारांची भाषा ओवेसी करत आहेत? असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी या देशाचे संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे, असे सांगण्याची हिंमत ओवेसींमध्ये ज्या दिवशी येईल, त्या दिवशी ओवेसी यांना राष्ट्रीय नेते म्हणून प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपासारख्या (BJP) राष्ट्रीय पक्षांचे अंगवस्त्र म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाईल. 

आज ओवेसींच्या (Asaduddin Owaisi) सभांमधून ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे उठत आहेत. त्यामागेही राजकीय सूत्र आहेच. फोडा, झोडा आणि विजय मिळवा. ओवेसी यांनाही त्याच विजयाचे सूत्रधार म्हणून वापरले जात आहे. पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपाचे राजकारण पुढे सरकणार नाही का? असा सवाल करत शिवसेनेने (Shivsena) रोखठोकमधून टोला लगावला आहे.

उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत काय होणार हे पाहावे लागेल. भाजपाच्या यशस्वी वाटचालीचे पडद्यामागचे सूत्रधार असदुद्दीन ओवेसी व त्यांचा पक्ष चांगलाच कामाला लागल्याचे दिसत आहे. निवडणुकांच्या निमित्ताने जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याची पूर्ण तयारी ओवेसींनी केलेली दिसते. ओवेसी हे भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. 

ओवेसी हे पश्चिम बंगालातही घाणेरडे राजकारण करत होते. ममता बॅनर्जी यांचा पराभव व्हावा, यासाठी मुसलमानांना भडकविण्यासाठी त्यांनी शर्थ केली. पण पश्चिम बंगालात हिंदू आणि मुसलमान या सर्वांनी ममता बॅनर्जी यांना भरभरून मते टाकली व ओवेसींच्या गलिच्छ राजकारणाला साफ झिडकारले. 

ओवेसी यांनी धर्मांधतेचा थयथयाट केला नसता, तर बिहारात तेजस्वी यादव या तरुणाच्या हाती सत्तेची सूत्रे गेली असती, पण धर्मांधतेचा आधार घेत मतविभागणी घडवायचीच व विजय विकत घ्यायचा हे व्यापारी धोरण एकदा ठरले की, दुसरे काय घडायचे, असे अग्रलेखात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकत्याच केलेल्या अमेरिकेच्या दौऱ्याचाही या लेखात उल्लेख केला आहे. “पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेत जाऊन धर्मांधता, दहशतवाद, फुटीरतावाद वगैरेंवर जोरदार भाषण केले व त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच, पण त्याच वेळी आपल्याच देशात ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे दिले जातात यास काय म्हणायचे? 

मोदी, योगींसारखे प्रखर राष्ट्रभक्त हिंदुत्ववादी नेते राज्यात व देशात सत्तेवर आहेत याचा ‘पाकिस्तान झिंदाबाद’वाल्यांना विसर पडला आहे. ओवेसी व त्यांच्या एम.आय.एम. पक्षाचे नक्की ध्येयधोरण काय आहे? मुसलमानांवरील अन्यायाचा डंका पिटत हे महाशय देशभर फिरत आहेत. त्यांच्या राजकारणाचे प्रायोजकत्व कोणी वेगळेच लोक करत असावेत.”

COMMENTS